Join us

हरभऱ्याच्या दरात मोठी घट तर गव्हाच्या दरात वाढ; वाचा शेतमाल बाजाराची काय आहे स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 13:27 IST

Agriculture Market Update : रब्बी पिकांची काढणी पूर्ण झाल्यामुळे जळगाव बाजार समितीमध्ये धान्याची आवक वाढली आहे. एकीकडे आवक वाढत असताना, दुसरीकडे भावात चढ-उतार होत आहे.

रब्बी पिकांची काढणी पूर्ण झाल्यामुळे जळगावबाजार समितीमध्ये धान्याची आवक वाढली आहे. एकीकडे आवक वाढत असताना, दुसरीकडे भावात चढ-उतार होत आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गुलाबी हरभऱ्याचे १० हजार रुपयांवर गेलेले भाव दोन आठवड्यात २ हजार रुपयांनी घसरले आहेत.

आठवडाभरापासूनच हरभऱ्याच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. सर्वच प्रकारच्या हरभऱ्याच्या काही प्रमाणात घट झाली आहे. २८ मार्च रोजी गुलाबी हरभऱ्याचे दर १० हजार ५०० रुपये क्विंटल इतके होते; मात्र आठ ते दहा दिवसांत दररोज हरभऱ्याच्या दरात घट झाली आहे. शनिवारी बाजार समितीमध्ये गुलाबी हरभऱ्याचे दर ८१०० रुपये प्रतिक्विंटल एवढे होते. भाव कमी होताच, बाजार समितीमध्ये गुलाबी हरभऱ्याची आवक देखील कमी झाली आहे. 

गव्हाच्या दरात मात्र वाढ...

नवीन गव्हाच्या दरात २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. ५ एप्रिल रोजी नवीन गव्हाचे दर २४०० रुपयांवर गेले होते. तर शनिवारी हेच दर २८०० रुपयांवर आले होते. बाजार समितीत दररोज १०० क्विंटलपर्यंत गव्हाची आवक आहे. तर २०० ते २५० क्विंटलपर्यंत हरभऱ्याची आवक सुरू आहे. शुक्रवारी ३३०० पर्यंत गेलेले दादरचे दर शनिवारी ४०० रुपयांनी कमी होऊन २००० रुपयांवर आले होते.

शनिवारी असे होते दर...

धान्य दर (प्रतिक्विंटल)
हरभरा चाफा५१०० ते ५६२०
गुलाबी हरभरा८ हजार १००
हरभरा चिनोली७३०० ते ७४००
गहू२८००
बाजरी२७६०
दादर२२०० ते २९७५
तूर७१००
सोयाबीन४ हजार

हेही वाचा : आरोग्यदायी स्ट्रॉबेरी वाढविणार रोगप्रतिकारशक्ती; वाचा गुणकारी फायदे

टॅग्स :बाजारशेती क्षेत्रशेतकरीपीकगहूमार्केट यार्डजळगाव