Lokmat Agro >बाजारहाट > 'ब्लॅक डायमंड' पेरूची कोल्हापुर बाजारात आवक; काय आहेत वैशिष्ट्ये? अन् कसा मिळाला दर

'ब्लॅक डायमंड' पेरूची कोल्हापुर बाजारात आवक; काय आहेत वैशिष्ट्ये? अन् कसा मिळाला दर

'Black Diamond' guava arrives in kolhapur market; What are the features? and how did you get the price? | 'ब्लॅक डायमंड' पेरूची कोल्हापुर बाजारात आवक; काय आहेत वैशिष्ट्ये? अन् कसा मिळाला दर

'ब्लॅक डायमंड' पेरूची कोल्हापुर बाजारात आवक; काय आहेत वैशिष्ट्ये? अन् कसा मिळाला दर

अकोला (वासुद, ता. सांगोला) येथील पांडुरंग आसबे यांच्या 'ब्लॅक डायमंड' पेरूची आवक कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत पहिल्यांदाच झाली आहे.

अकोला (वासुद, ता. सांगोला) येथील पांडुरंग आसबे यांच्या 'ब्लॅक डायमंड' पेरूची आवक कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत पहिल्यांदाच झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कोल्हापूर : अकोला (वासुद, ता. सांगोला) येथील पांडुरंग आसबे यांच्या 'ब्लॅक डायमंड' पेरूची आवक कोल्हापूरशेती उत्पन्न बाजार समितीत पहिल्यांदाच झाली आहे.

सध्या पेरूचे दर घसरलेले असताना या पेरूला प्रतिकिलो १०१ रुपये दर मिळाला. पांडुरंग आसबे यांनी थायलंड ब्लॅक डायमंडची रोपे आणून लागवड केली होती. त्याचे उत्पादन सध्या सुरू झाले आहे.

त्याची आवक बाजार समितीच्या इरफान बागवान व मोहसीन बागवान यांच्याकडे झाली आहे. बागवान यांच्या अडत दुकानात आलेले पेरू लिलावात प्रसाद नंदकुमार वळंजू यांनी खरेदी केले. नितीन सूर्यवंशी, तेजस डोके, संभाजी चिले, राजू शिंदे, धनाजी कुंभार, आदी उपस्थित होते.

ब्लॅक डायमंड पेरूची वैशिष्ट्ये
▪️हा पेरू बाहेरून व आतून एकदम लाल आहे. तसेच त्याचे झाडदेखील लाल आहे.
▪️बियांचे प्रमाणदेखील अतिशय कमी असून इतर पेरूपेक्षा गोडी आणि टिकवण क्षमता उत्कृष्ट असल्यामुळे मार्केटमध्ये चांगली मागणी व उठाव होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: 'Black Diamond' guava arrives in kolhapur market; What are the features? and how did you get the price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.