Lokmat Agro >बाजारहाट > अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये सांगितला तसा हमीभाव शेतकऱ्यांना खरंच मिळतोय का?

अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये सांगितला तसा हमीभाव शेतकऱ्यांना खरंच मिळतोय का?

budget-2024 : Are the farmers really getting msp for their agriculture produce | अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये सांगितला तसा हमीभाव शेतकऱ्यांना खरंच मिळतोय का?

अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये सांगितला तसा हमीभाव शेतकऱ्यांना खरंच मिळतोय का?

Budget 2024: निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प मांडताना शेतकऱ्यांना हमीभावामुळे फायदा झाल्याचे नमूद केले, पण वस्तुस्थिती काय आहे? जाणून घेऊ या.

Budget 2024: निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प मांडताना शेतकऱ्यांना हमीभावामुळे फायदा झाल्याचे नमूद केले, पण वस्तुस्थिती काय आहे? जाणून घेऊ या.

शेअर :

Join us
Join usNext

आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडला. तो मांडताना त्यांनी पीएम किसान योजनेसह, घरकुलांची योजना, ८० कोटी जनतेला मोफत रेशन, तेलबियांच्या बाबतीत सक्षमीकरण इत्यादी शेतीविषयक बाबींचा आढावा मांडतानाच किमान हमी भावात केलेली वाढ आणि त्यातून शेतकऱ्यांचे वाढलेले उत्पन्न यावर जोर दिला. परंतु मागील काही दिवसांपासून बदलत्या निर्यात धोरणांमुळे सोयाबीनसह अनेक प्रकारच्या शेतमालाला किमान हमी भाव मिळताना दिसून येत नाही.

सोयाबीनचे भाव
मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे बाजारभाव सातत्याने हमीभावापेक्षा कमीच राहत असून केवळ एक दोन बाजारसमित्यांमध्ये जास्तीत जास्त बाजारभाव मोठ्या मुश्कीलीने हमीभावापर्यंत पोहोचत आहेत. मात्र सरासरी व कमीत कमी बाजारभाव हे किमान हमीभावापेक्षा कमीच असल्याचे दिसून येत आहेत. आज अंतरिम बजेटच्या दिवशी म्हणजेच दिनांक १ फेब्रुवारी रोजी सोयाबीनचे कमीत कमी दर ३५०० रुपये ते ४२०० रुपये आणि सरासरी दर हे ४२०० ते ४५०० रुपये प्रति क्विंटल दिसून आले. 

कृषी विभागाच्या स्मार्ट योजनेच्या बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम निवारण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार मागील आठवड्यात लातूर बाजारात सोयाबीनची सरासरी किंमत रु. ४६२० प्रती क्विटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनची आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर ३८ टक्के घट झाली आहे.  सन २०२३-२४ मध्ये भारतात सोयाबीनचे उत्पादन ११५ लाख टन होण्याचा अंदाज आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत १८% कमी आहे. (MOA&FW) खरीप हंगाम २०२३-२४ साठी किमान आधारभूत किंमत रु. ४६०० प्रती क्विटल आहे.

सोयाबीनचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

01/02/2024
छत्रपती संभाजीनगर---41422642514238
हिंगोली- खानेगाव नाकापिवळा114423043004265
गंगाखेडपिवळा20470048004700
पाथरीपिवळा6350043504300
उमरखेडपिवळा100460046504620

कापूस
यंदा कापसाच्या दराने शेतकऱ्यांची निराशा केली असून कापासाला अपेक्षेपेक्षा कमी दर मिळत आहे. तर काही शेतकऱ्यांनी मागच्या हंगामातील कापूसही साठवून ठेवला आहे पण दर कमी असल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. यंदा देशांतर्गत कापसाचे उत्पादन कमी झाले असूनही दर कमी आहेत. तर केंद्र सरकारने कापसाच्या गाठी आयात केल्यामुळे दर कमी झाल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 

काल दिनांक ३१ जानेवारी रोजी  ए.के.एच. ४ - लांब स्टेपल, मध्यम स्टेपल आणि लोकल कापसाची आवक झाली होती.  देऊळगाव राजा येथे आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ५ हजार ५०० क्विंटल कापसाची आवक झाली होती. त्यानंतर भद्रावती आणि सेलू तालुक्यातील सिंदी येथेही मोठ्या प्रमाणात कापसाची आवक झाली आहे. नेर परसोपंत या बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे ५ हजार ८५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. हा दर हमीभावापेक्षा १ हजार २०० रूपयांनी कमी आहे. 

Web Title: budget-2024 : Are the farmers really getting msp for their agriculture produce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.