Lokmat Agro >बाजारहाट > मध्यस्थांची साखळी तुटल्याने थेट ग्राहकाच्या दारी येणार आंबा, शेतकऱ्यांना मिळणार चांगला भाव

मध्यस्थांची साखळी तुटल्याने थेट ग्राहकाच्या दारी येणार आंबा, शेतकऱ्यांना मिळणार चांगला भाव

By breaking the chain of intermediaries, mangoes will come directly to the consumer's doorstep | मध्यस्थांची साखळी तुटल्याने थेट ग्राहकाच्या दारी येणार आंबा, शेतकऱ्यांना मिळणार चांगला भाव

मध्यस्थांची साखळी तुटल्याने थेट ग्राहकाच्या दारी येणार आंबा, शेतकऱ्यांना मिळणार चांगला भाव

कोकणचा हापूस विक्रीसाठी फक्त कृषी उत्पन्न बाजार समितीवर विसंबून न राहता आता शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठीचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे.

कोकणचा हापूस विक्रीसाठी फक्त कृषी उत्पन्न बाजार समितीवर विसंबून न राहता आता शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठीचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नामदेव मोरे
नवी मुंबई: कोकणचा हापूस विक्रीसाठी फक्त कृषी उत्पन्न बाजार समितीवर विसंबून न राहता आता शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठीचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. मुंबईस्थितकोकणवासीयांच्या मदतीने थेट ग्राहकांपर्यंत हापूस पोहोचविण्यात येत असून, या उपक्रमास ग्राहकांचाही प्रतिसाद वाढत आहे.

मध्यस्थांची साखळी तुटल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो व स्वस्त, उत्तम दर्जाचा हापूस आंबा मिळू लागला आहे. मुंबई, आंब्याची नवी मुंबई, ठाणे ही हापूस देशातील सर्वांत प्रमुख बाजारपेठ आहे. सर्वाधिक आंबा याच परिसरात विकला जातो.

यापूर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती हा आंबा विक्रीसाठी एकमेव पर्याय होता; परंतु मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत आंबा पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक वर्षी या उपक्रमास प्रतिसाद वाढत आहे.

अशा प्रकारे होतो पुरवठा
-
मुंबईमध्ये अनेक वर्षांपासून स्थिरावलेले कोकणवासीय नागरिक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांच्या मदतीने थेट ग्राहकांपर्यंत आंबा पोहोचविला जात आहे.
- या उपक्रमाशी अनेक मुंबईकर जोडले जात आहेत.
- आपल्या संपर्कामधील नागरिकांकडून आंब्याची ऑर्डर नोंदविली जाते.
- शेतकऱ्यांना किती आंबे लागणार हे कळविले जाते. या मागणीप्रमाणे शेतकरी ट्रकमधून आंबे पाठवून देतात. प्रत्येक विभागात तो पाठविला जातो.
- नवी मुंबईमध्ये सीवूड, वाशीसह शहरातील अनेक भागांत अशा प्रकारे कोकणातून थेट आंबा विक्रीसाठी येत आहे.
- मुंबईमध्येही आंबा महोत्सवाच्या माध्यमातून थेट आंबा ग्राहकांपर्यंत पोहोचविला जात आहे.

विविध उपक्रम
सद्यःस्थितीमध्ये मार्केटमध्ये कोकणच्या हापूसच्या नावाखाली कर्नाटकचा हापूस देण्याचे प्रकारही वाढले आहेत. प्रत्येक आंब्याला देवगडचा हापूस असल्याचे दाखविले जात आहे. यामुळे ग्राहकांची फसवणूक होत असते. आंबा महोत्सव व थेट शेतकरी ते ग्राहक योजनांसारखे उपक्रम राबवून ग्राहकांना खात्रीने कोकणचा हापूस उपलब्ध होत आहे.

कोरोना काळापासून आम्ही देवगडचा हापूस थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम सुरू केला. सी- वूडमधील कवी कुसुमाग्रज वाचनालयाचीही या उपक्रमास साथ मिळते. प्रत्येक वर्षी या उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. - भूषण मालवणकर, सी-वूड

अधिक वाचा: Mango Export परदेशात पोहोचला इतका मेट्रिक टन आंबा

Web Title: By breaking the chain of intermediaries, mangoes will come directly to the consumer's doorstep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.