Cashew Price : काजू दरात समाधानकारक वाढ झाली असून आज रोजी मुंबई बाजारात जवळपास 144 क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी क्विंटल मागे 82 हजार 500 रुपयांचा दर मिळाला. मागील आठवडाभरापासून सरासरी क्विंटलमागे हाच दर मिळतो आहे. मागील आठवडाभर काजूचे दर स्थिर असल्याचे चित्र आहे.
मुंबई बाजारातील (Mumbai Kanda Market) मागील आठवडाभरातील काजूचे बाजारभाव पाहिले असता 20 ऑगस्ट रोजी मुंबई बाजारात 230 क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 70 हजार रुपये ते 82 हजार 500 रुपयांचा दर मिळाला. तर 21 ऑगस्ट रोजी देखील मुंबई बाजारात 365 क्विंटलची आवक होऊन सरासरी 82 हजार 500 रुपयांचा दर मिळाला.
तसेच 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट तसेच आज रोजी देखील कमीत कमी दर 70 हजार रुपये तर सरासरी दर हा 82 हजार 500 रुपये मिळाला. त्यामुळे मागील आठवड्याभरापासून काजूचे दर टिकून असल्याचे चित्र आहे.
नेमकं कारण काय?
सुक्या मेव्यांमध्ये काजू हा स्वादिष्ट पदार्थ महाग झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून काजूच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. काजू उत्पादक देशांमध्ये यंदा काजू उत्पादन ४० टक्के घटले. त्यामुळे आवक कमी झाल्याने काजूच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. भारताव्य- तिरिक्त आफ्रिकन देशांतील काजू उत्पादनावर सुमारे ८० टक्के परिणाम झाला आहे. मागील महिन्यात ८५० ते ९०० रूपये किलोने मिळणारे काजू आता ११०० ते १२०० रूपये असे मिळताहेत.