Join us

कापसाला बाजारात चांगला भाव न मिळाल्यास हमीदराने खरेदीसाठी सीसीआय सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 12:10 PM

शेतकऱ्याला बाजारात हमीभाव मिळत नसल्याने आपला कापूस शासनाच्या केंद्रावर विकण्याची वेळ आली आहे. सीसीआयने (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) आतापर्यंत ११ लाख ६५ लाख क्विंटल कापसाची शेतकऱ्यांकडून खरेदी केली आहे. आणखी ७० टक्के कापूस येणे बाकी असल्याचा सीसीआयचा अंदाज आहे.

शेतकऱ्याला बाजारात हमीभाव मिळत नसल्याने आपला कापूस शासनाच्या केंद्रावर विकण्याची वेळ आली आहे. सीसीआयने (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) आतापर्यंत ११ लाख ६५ लाख क्विंटल कापसाची शेतकऱ्यांकडून खरेदी केली आहे. आणखी ७० टक्के कापूस येणे बाकी असल्याचा सीसीआयचा अंदाज आहे.

राज्यात चांगल्या दर्जाच्या कापसाला ६ हजार ९७० रुपये हमीभाव शासनाने निश्चित केला आहे. सुरुवातीला कापसाला खासगी बाजारात चांगला भाव होता. त्यामुळे यावर्षीही शासनाला कापूस खरेदी केंद्र उघडावी लागणार नाहीत, असा अंदाज होता; परंतु प्रत्यक्षात हा अंदाज खोटा ठरला.

बाजारात शेतकऱ्यांच्या कापसाचा 'दर्जा चांगला नाही' असा ठपका ठेवून व्यापारी वर्ग त्यांची लूट करू लागला, कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळू लागला. त्यामुळे शासकीय कापूस खरेदी केंद्राची आवश्यकता निर्माण झाली. आज सीसीआयने राज्यात ११० कापूस-खरेदी केंद्रे सुरू केली आहेत.

कापसाचा दर्जा उत्तम■ सुरुवातीला राज्यात पावसामुळे कापसाची गुणवत्ता काहीशी घसरली होती; परंतु सध्या उत्तम प्रतीचा कापूस येतो आहे.■ आतापर्यंत ३० टक्के कापूस, आला आहे. आणखी ७० टक्के कापूस येण्याची प्रतीक्षा आहे.

साडेचार कोटी क्विंटल उत्पादनाचा अंदाज■ यंदा राज्यात साडेचार कोटी क्विंटल कापसाचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे.■ गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरा कमी झाल्याने उत्पादन घटू शकते.

खरेदीसाठी सीसीआयने ११० केंद्रे सुरू केली. बाजारात चांगला भाव न मिळाल्यास हमीदराने खरेदीसाठी सीसीआय सज्ज आहे. - एस. के. पाणिग्रही, वरिष्ठ महाव्यवस्थापक, सीसीआय, मुंबई

टॅग्स :कापूसपीकशेतकरीबाजारमार्केट यार्ड