Join us

चंपाषष्ठीनिमित्त पुणे बाजार समितीत कांदापात, मेथी, वांगी महाग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 9:21 PM

पावशेर वांग्यांची विक्री ४० ते ५० रुपये तर कांदापात, मेथी ३० ते ३५ रूपये भाव

- अजित घस्ते

पुणे: चंपाषष्ठीनिमित्त नैवेद्यासाठी कांदापात, मेथी, वांग्यांना मागणी वाढते. पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड तालुक्यातून मार्केट यार्डातील तरकारी विभागात मोठया प्रमाणात कांदापात, मेथीची आवक झाली आहे.यामध्ये कांदापात ची तब्बल २० हजार जुडींची आवक झाली तर मेथीच्या २५ हजार जुडींची आवक झाली. नाशिक, जालना, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मेथी विक्रीस पाठविली. कांदापात, मेथीच्या मागणीत वाढ झाली असून, मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील पालेभाजी व्यापारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.

किरकोळ बाजारात कांदापातीच्या एका जुडीला ३० रुपये दर मिळाले. मेथीच्या एका जुडीला ३० ते ३५ रुपये भावाने विक्री सुरू आहे. घाऊक बाजारात मेथीच्या शेकडा जुडीला १५०० ते २५०० रुपये असे दर मिळाले. कांदापातीच्या शेकडा जुडींना ८०० ते १६०० रुपये दर मिळाले. कांदापात, मेथीसह वांग्यांना मागणी वाढली आहे. किरकोळ बाजारात पावशेर वांग्यांची विक्री ४० ते ५० रुपये दराने केली जात आहे. घाऊक बाजारात दहा किलो वांग्यांना ४०० ते ५०० रुपये दर मिळाले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने कोथिंबीर, मेथी, शेपू, चाकवत, करडई, मुळा, पुदिना, चवळईच्या दरात वाढ झाली.

किरकोळ बाजारातील दर

प्रकार             जूडी भाव

  • कोथिंबीर :       २०ते ३०
  • मेथी :              २५ ते ३०
  • कांदापात :      २५ ते ३०
  • हरभरा गड्डी :  २० ते २५
  • वांगी :             १२० ते १६०

चंपाषष्ठीनिमित्त कांदापात, मेथी, वांगी यांचा खंडोबाला देवाला नैवद्द केला जातो. यावेळी याभाजीला मागणी वाढलेली असते.त्यामुळे भाजी-पोळीचा नैवद्द दिला जातो.यामुळे या दिवसांत या भाज्यांना मागणी असल्याने महाग झाली आहे.

- आशा गावडे, गृहणी

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड