Lokmat Agro >बाजारहाट > Chana price: हरभऱ्याचा बाजार होतोय गरम; निवडणुका संपल्यावर भाववाढ होणार?

Chana price: हरभऱ्याचा बाजार होतोय गरम; निवडणुका संपल्यावर भाववाढ होणार?

Chana price: Gram market is getting hot, know the future price of chana after elections | Chana price: हरभऱ्याचा बाजार होतोय गरम; निवडणुका संपल्यावर भाववाढ होणार?

Chana price: हरभऱ्याचा बाजार होतोय गरम; निवडणुका संपल्यावर भाववाढ होणार?

Future chana gram prices after loksabha elections: लोकसभा निवडणुक प्रक्रिया संपल्यावर दबावात असलेला हरभरा बाजार आणखी वधारू शकतो.

Future chana gram prices after loksabha elections: लोकसभा निवडणुक प्रक्रिया संपल्यावर दबावात असलेला हरभरा बाजार आणखी वधारू शकतो.

शेअर :

Join us
Join usNext

हरभऱ्याच्या बाजारातील किंमती(Chana price) वाढताना दिसत आहेत. लातूर बाजारात हमीभावापेक्षाही किंमती जास्त आहेत. साधारणत: ६ हजार ते ६२०० रुपये प्रति क्विंटल असा भाव हरभऱ्याला मागच्या आठवड्यात मिळाला. सध्या हरभऱ्यासाठी किमान आधारभूत किंमत (हमीभाव) ५४४० रुपये प्रति क्विंटल अशी आहे.

उत्तरेकडील बाजारपेठांचा विचार करता एकूणच या महिन्यात हरभऱ्याच्या भावात २४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. आवक कमी आणि मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे. मात्र, निवडणुकीमुळे सरकारी दबावामुळे भाव कमी झाले होते, मात्र निवडणुका पूर्ण होताच भाव झपाट्याने वाढतील, असे बाजारातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

उत्पादनात घट झाल्याच्या बातम्यांमुळे हरभऱ्याचे भाव वाढले. याच महिन्यात, ४ मे रोजी बिकानेरच्या घाऊक बाजारात हरभरा ५७८९ रुपये प्रति क्विंटलने विकला जात होता, तो वाढून ७२०० रुपये प्रति क्विंटल झाला. 

मागील आठवड्यातील हरभरा बाजारभाव
मागील आठवड्यातील हरभरा बाजारभाव

दिल्लीच्या बाजारात हरभऱ्याचा भाव ७३३७ रुपये प्रति क्विंटल झाला. तर मे २०२३ मध्ये हरभऱ्याचा सरासरी भाव ५०० रुपये प्रति क्विंटल होता. किरकोळ बाजारात हरभरा ९० ते १०० रुपये किलोने विकला जात आहे.

हरभऱ्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे रोजी हरभऱ्याच्या आयातीवरील शुल्क हटवण्याची घोषणा केली होती. आयात शुल्क हटवण्याच्या घोषणेने हरभऱ्याच्या भावात घसरण सुरू झाली. आयात शुल्क हटवल्याबरोबरच शेतकरी आणि व्यावसायिकांमध्ये हे जाणवलं की यावेळी उत्पादन कमी आहे.

त्यामुळेच सरकारने आयातीचे दरवाजे पूर्णपणे उघडले आहेत. मात्र बाजारातील  साठेबाज व शेतकऱ्यांनी भाव वाढण्याच्या आशेने माल रोखून धरण्यास सुरुवात केली. त्यामुळेच मतदान संपताच भाव आणखी वाढतील, हरभरा आठ हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता बिकानेरच्या एका व्यापाऱ्याने व्यक्त केली आहे. अर्थात महाराष्ट्रात हरभऱ्यावर त्याचा किती परिणाम होणार हे त्याच वेळेस स्पष्ट होईल.

देशातील हरभरा उत्पादन
देशातील हरभरा उत्पादन

कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २०२३-२४ मध्ये हरभरा उत्पादन १२१.६१ लाख मेट्रिक टन  झाल्याचा अंदाज आहे. व्यापाऱ्यांचा अंदाज ८० लाख टन असला तरी देशात हरभऱ्याचा खप १०० लाख टन एवढा आहे.

दरम्यान पुणे येथील स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या बाजार माहिती विश्लेषण व जोखीम व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हरभरा उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात हमीभावापेक्षा हरभऱ्याला जास्त भाव मिळत आहे.

Web Title: Chana price: Gram market is getting hot, know the future price of chana after elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.