Join us

छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यम स्टेपल कापसाला आज सर्वाधिक भाव

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 13, 2024 3:41 PM

राज्यात सध्या कापसाचे भाव सात हजार पार गेले आहेत. मागील काही दिवसांपासून  विदर्भातून कापसाची सर्वाधिक आवक होत आहे. आज ...

राज्यात सध्या कापसाचे भाव सात हजार पार गेले आहेत. मागील काही दिवसांपासून  विदर्भातून कापसाची सर्वाधिक आवक होत आहे. आज छत्रपती संभाजीनगर बाजारसमितीत कापसाला सर्वाधिक ८२०० रुपये क्विंटल भाव मिळत होता.

बुलढाण्यात लोकल कापसाला सर्वसाधारण 750० ते 7720 रुपयांचा भाव मिळत असून उर्वरित ठिकाणीही कापसाचे दर साधारण ६९०० ते ७८०० रुपयांपर्यंत आहेत. आज छत्रपती संभाजीनगर बाजारसमितीत मध्यम स्टेपल कापसाला ८२०० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला. आज दुपारपर्यंत केवळ तीन बाजारसमितींमध्ये कापसाची आवक झाली होती.

दरम्यान, काल शुक्रवारी राज्यात ९ हजार ५७१ क्विंटल कापसाची आवक झाली. यावेळी वर्धा बाजारसमितीत ३५२० क्विंटल कापसाची आवक झाली होती. यावेळी सर्वसाधारण दर ७२०० ते ७४०० रुपयांच्या दरम्यानच राहिला. मध्यम स्टेपल कापसाचा दर सध्या ८००० रुपयांपर्यंत गेला असल्याचे पणन विभागाच्या माहितीवरून स्पष्ट होते. मागील चार ते पाच दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर बाजारसमितीत मध्यम स्टेपल कापसाला मिळणारा भाव ८२०० रुपये क्विंटलवर स्थिरावला आहे.

 

टॅग्स :कापूसबाजारमार्केट यार्ड