Join us

China Lasun : मुंबई बाजार समितीमध्ये चिनी लसणाचे पाच कंटेनर दाखल कसा मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 10:13 AM

टंचाई दूर करण्यासाठी चीनवरूनही लसणाची आयात सुरू झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच कंटेनर दाखल झाले आहेत.

नवी मुंबई : टंचाई दूर करण्यासाठी चीनवरूनही लसणाची आयात सुरू झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच कंटेनर दाखल झाले आहेत.

देशी लसणाला १३० ते २८० रुपये किलो भाव मिळत आहे. चीनवरून आलेला लसूण हा १५० ते २७० रुपये किलो दराने मुंबई बाजार समितीमध्ये विकला जात आहे.

किरकोळ मार्केटमध्ये लसणाचे दर ३५० ते ३६० रुपये किलोवर पोहोचले आहेत. यावर्षीही देशभर लसणाची टंचाई निर्माण झाली आहे.

पुढच्या जानेवारीपर्यंत बाजारभाव तेजीत राहण्याची शक्यता आहे. वाढती महागाई रोखण्यासाठी गुरुवारी बाजार समितीमध्ये पाच कंटेनरमधून चीनच्या लसणाची आयात झाली आहे.

लसणाचे दर किलोमध्येदेशी - १३० ते २८०चीन - १५० ते २७०किरकोळ - ३५० ते ३६०

चीनचा लसूण बाजार समितीमध्ये विक्रीला येत आहे. देशी लसणापेक्षा याचे दर कमी आहेत. परंतु देशी लसणाप्रमाणे त्यामध्ये औषधी गुण आढळत नाहीत. - मनोहर तोतलानी, व्यापारी, एपीएमसी

टॅग्स :मार्केट यार्डबाजारचीनपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीनवी मुंबईमुंबई