Join us

Cotton Market : ताडकळस बाजारात कापसाची किती खरेदी; काय मिळतोय दर ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 11:44 IST

शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून प्रसिद्ध असलेल्या कापसाची खरेदी सुरू झाली आहे. त्याला काय दर मिळतोय ते वाचा सविस्तर (Cotton Market)

Cotton Market :  शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून प्रसिद्ध असलेल्या कापसाची खरेदी सुरू झाली आहे. १० डिसेंबर रोजी ताडकळस येथे 'सीसीआय'अंतर्गत खरेदीला सुरुवात झाली असून तीन दिवसांत तब्बल १ हजार १०० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. यात ७ हजार ४७१ रुपये उच्चांकी दर कापसाला मिळाला आहे.

पूर्णा तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. यंदाही अनेक शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली. मात्र, अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठी घट झाली.

शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. ताडकळस शिवारात साडेसात हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली असून, शेतकरी कापूस वेचणी करून विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांच्या कापसाला शासनाने हमीभाव जाहीर केला असून याअंतर्गत ताडकळस कृषी बाजार समितीत 'सीसीआय'कडून कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे.

सभापती बालाजी रुद्रवार यांच्या हस्ते खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. सीसीआय कापूस खरेदीची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपसभापती अंकुशराव शिंदे, सरपंच गजानन आंबोरे यांच्यासह शेतकरी, सीसीआयचे अधिकारी, बाजार समिती संचालक मंडळाची उपस्थिती होती.

कापसाला ७,४७१ उच्चांकी दर

यंदा ताडकळस शिवारातील शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे. दोन वेचण्यातच कापसाच्या पहाट्या झाल्या आहेत. हाती आलेला कापूस शेतकरी बाजारपेठेत विक्रीसाठी आणत असून सीसीआयकडून ७ हजार ४७१ रुपये उच्चांकी दर देऊन कापूस खरेदी केला.

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड