Lokmat Agro >बाजारहाट > cotton Market : शासकीय केंद्रात कापसाची आवक वाढतेय वाचा सविस्तर

cotton Market : शासकीय केंद्रात कापसाची आवक वाढतेय वाचा सविस्तर

Cotton Market : Inflow of cotton is increasing in the government center, read in detail | cotton Market : शासकीय केंद्रात कापसाची आवक वाढतेय वाचा सविस्तर

cotton Market : शासकीय केंद्रात कापसाची आवक वाढतेय वाचा सविस्तर

शासकीय कापूस खरेदी केंद्रावर आता शेतकऱ्यांची कापूस विक्री करण्यासाठी गर्दी वाढताना दिसत आहे. (cotton Market)

शासकीय कापूस खरेदी केंद्रावर आता शेतकऱ्यांची कापूस विक्री करण्यासाठी गर्दी वाढताना दिसत आहे. (cotton Market)

शेअर :

Join us
Join usNext

cotton Market : शासकीय कापूस खरेदी केंद्रावर आता शेतकऱ्यांची कापूस विक्री करण्यासाठी गर्दी वाढताना दिसत आहे.   बदनापूर येथे भारतीय कापूस निगमच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शासकीय कापूस खरेदी केंद्रात आतापर्यंत १३ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. मात्र, खरेदी केंद्राच्या परिसरात शेतकऱ्यांना थांबण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे.

केंद्रावर मोठ्या प्रमाणात आवक सुरू असल्याने आणखी एक खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. येथील प्राईम जिनिंग प्रेसिंगमध्ये केंद्र शासनाचे सीसीआय शासकीय कापूस खरेदी केंद्र ६ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहे.

या केंद्रावर दररोज ४० ते ५० कापसाची वाहने येतात. यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. शेतकऱ्यांनी आणलेल्या कापसाचे मोजमाप दुसऱ्या दिवशी होत असल्यामुळे व येथे शेतकऱ्यांना मुक्कामी थांबण्यासाठी व्यवस्था नाही.

हे केंद्र शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असल्यामुळे शेतकऱ्यांना कापसाचे वाहन या जिनिंगमध्ये उभे करून रात्री घरी जावे लागते. शेतकऱ्यांना राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांचा जाण्या- येण्याकरिता जास्तीचा वेळ व पैसा खर्च होत आहे. या केंद्रावर मोजमाप एका दिवसात होत नसल्यामुळे बदनापूर येथे आणखी एक शासकीय कापूस खरेदीचे केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

वाहन व्यवस्थेसाठी निधी नाही

बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांच्या वाहनांची व्यवस्था करण्यासाठी बाजार समितीकडे खर्च करण्यासाठी आवश्यक निधी नाही.

• त्यामुळे कापसाची वाहने संबंधित जिनिंगमध्ये थांबविली जातात. केंद्र सुरू झाल्यापासून आजपर्यंत १३ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव सुरेश जिगे यांनी दिली.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये कापसाची आवक किती झाली आणि काय भाव मिळाला.

शेतमाल : कापूस

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/11/2024
सावनेर---क्विंटल2600700070507025
किनवट---क्विंटल73680071007050
राळेगाव---क्विंटल2500700075217100
भद्रावती---क्विंटल1517705075217286
समुद्रपूर---क्विंटल1679690075217100
वडवणी---क्विंटल102675070006940
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ - लांब स्टेपलक्विंटल35752175217521
उमरखेडएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल20690071007000
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल915690071507050
सोनपेठएच - ६ - मध्यम स्टेपलक्विंटल246690071007050
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल755680072007000
घाटंजीएल. आर.ए - मध्यम स्टेपलक्विंटल3500690070507000
अकोलालोकलक्विंटल3044733174717396
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल1085739674717433
उमरेडलोकलक्विंटल873700070807040
वणीलोकलक्विंटल2148722075217437
मनवतलोकलक्विंटल5200690075007225
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल560701171517050
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल624697572007100
किल्ले धारुरलोकलक्विंटल1380702671017026
मारेगावलोकलक्विंटल782685070506950
नेर परसोपंतलोकलक्विंटल21700070007000
काटोललोकलक्विंटल279690071507000
हिंगणालोकलक्विंटल78671571507050
किल्ले धारुरलांब स्टेपलक्विंटल1286722174217321
पांढरकवडालांब स्टेपलक्विंटल2207670075217229
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल800722573507300
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल6500700073707100
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल2105700075217250
बार्शी - टाकळीमध्यम स्टेपलक्विंटल7500747174717471
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल1380680572817150

(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

Web Title: Cotton Market : Inflow of cotton is increasing in the government center, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.