सत्यशिल धबडगे
यावर्षीच्या कापूस हंगामात महिन्यापासून सात हजारांच्या आत असणाऱ्या कापसाच्या भावात दोनशे ते तीनशेने रुपये वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. गत आठवड्यापर्यंत ६ हजार ८५० पर्यंत भाव होते. मात्र शनिवारपासून बाजारपेठेत तेजी आल्याचे चित्र आहे. बुधवारी ७ हजार ४०० रुपयेकापसाला भाव मिळाल्याने आगामी काळात याबाबत काय स्थिती असते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. मानवत तालुक्यात एकूण २३ हजार ६७३ हेक्टरवर (५४ टक्के क्षेत्रावर) कापसाची लागवड होती. त्या खालोखाल १५ हजार ८४७ हेक्टरवर (३६ टक्के क्षेत्रावर) सोयाबीनची पेरणी आहे. तूर २ हजार १२७ हेक्टरवर, मूग ७७५ हेक्टर, उडीद १९८ हेक्टर, मका १४९ हेक्टर, खरीप ज्वारी १३४ हेक्टर, बाजरी ८२ हेक्टरवर, तीळ २३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली होती.
कापसाची काढणी शेत शिवारात सुरू असल्याचे चित्र आहे. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झाली, असे शेतकरी किरकोळ खर्चासाठी कापूस विक्री करत असल्याचे दिसून येत आहे. १४ नोव्हेंबरपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात लिलावाद्वारे कापसाच्या खरेदी-विक्रीला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी कापसाला सरासरी सात हजार चारशेचा दर मिळाला. यानंतर मात्र पंधरा दिवसांत कापसाच्या दरात १०० ते १५० रुपयांची घसरण झाली. पूर्ण डिसेंबर महिन्यात ७ हजार ५० ते ७ हजारांपर्यंत भाव मिळाला. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तर ६ हजार ८०० रुपयांपर्यंत भाव खाली आले होते. फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरा दिवसांत भावाबाबत 'जैसे थे' स्थिती होती.
मात्र, १७ फेब्रुवारीला तीनशे रुपयांची वाढ दिसून आली यामुळे कापसाला सात हजार २०० सरासरी दर मिळाला. ७ हजार २५० तर बुधवारी ७ हजार २८० सरासरी दर मिळाला. भाव कमी अधिक होत असल्याने आपला कापूस विक्री - करण्याचा निर्णय घेतलेल्य शेतकऱ्यांना गत दोन दिवसांपासून फायदा होत असल्याचे चित्र कापूर लिलावात दिसून येत होते.
सीसीआयची कटकट बंद
यावर्षी केंद्र शासनाने कापसाला ७ हजार वीस रुपये हमीभाव जाहीर केला होता. कापसाचे दर हमीदराच्या खाली आल्यानंतर स्वरेदीला सुरुवात केली होती. मात्र पीक पेयाची कटकट असल्याने शेतकऱ्यांना सीसीआयला कापूस विक्री करता येत नव्हता.
सद्यस्थितीत कापसाला हमीदरापेक्षा दोनशे ते तीनशे रुपये जास्त मिळत असल्याने सीसीआयची कटकट बंद झाली आहे.
बुधवारी मिळाला ७ हजार ४०० भाव
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज यार्डात बुधवारी झालेल्या कापूस लिलावात कापसाला वरचा दर ७ हजार ४०० रुपये मिळाला तर सरासरी दर ७३०० रुपये मिळाला. यावेळी लिलावात जिनिंग व्यापारी जुगलकिशोर काबरा, रामनिवास सारडा सागर मुंदडा, मयंक अग्रवाल आदी व्यापारी सहभागी झाले होते.