Join us

Cotton Market Rate : खेतिया बाजार समितीत मुहूर्ताला पहिल्या दिवशी १२० क्विंटल कापूस खरेदी; वाचा काय मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 9:22 AM

खेतिया बाजार समितीत यंदाच्या हंगामातील कापूस (Cotton) खरेदीला प्रारंभ झाला असून शुभारंभ भाव हा सात हजार ५०१ इतका मिळाला. तर पहिल्या दिवशी १२० क्विंटल आवक झाली होती.

खेतिया बाजार समितीत यंदाच्या हंगामातील कापूस खरेदीला प्रारंभ झाला असून शुभारंभ भाव हा सात हजार ५०१ इतका मिळाला. तर पहिल्या दिवशी १२० क्विंटल आवक झाली होती.

सोमवारपासून कापूसबाजारात मुहूर्तासह कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. यावेळी बाजार समितीच्या प्रांगणात व्यापारी, शेतकरी, हमाल, मापाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कापूस खरेदी सुरू होत आहे असे कळताच बाजार समितीमध्ये वाहनांची वर्दळ सुरू झाली. सर्वांत जास्त भाव सर्वप्रथम पहिले वाहन व पहिली बोली झोतवाडे (महाराष्ट्र) येथील शेतकरी मनोज सुकदेव सदाराव यांच्या कापसाला ७,५०१ रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात आला.

तसेच कापूस खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शुभारंभप्रसंगी कापसाला जास्तीत जास्त भाव ७,७०० रुपये तर कमीत कमी पाच हजार ५० रुपये तर सरासरी ७,२०० रुपये एवढा भाव होता. यावेळी बाजार समितीमध्ये एकूण १६ वाहन कापूस विक्रीसाठी आले होते आणि एकूण आवक १२० क्विंटल होती.

यावेळी आमदार श्याम बर्डे, प्रांताधिकारी रमेशचंद्र सिसोदिया, बाजार समितीचे सचिव मंसाराम जमरे, खेतिया कॉटन असोसिएशनचे अध्यक्ष अमित मालवीय, माजी अध्यक्ष महिपाल नाहर, भाजपा खेतिया मंडळ अध्यक्ष कमलेश राजपूत, नगर पंचायत अध्यक्ष दशरथ निकुम, ज्येष्ठ नेते कौशिक पटेल, गोविंद जोशी, उपस्थित होते. बाजार समितीत यंदा खरेदी केलेल्या कापसाची दोन लाखांपर्यंतची रक्कम ही रोख दिली जाणार आहे.

■ मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात राज्यातील शेतकऱ्यांची कापूस विक्रीसाठी खेतिया बाजारपेठ विश्वासू बाजार पेठ म्हणून प्रसिद्ध आहे. या तीन राज्यातील शेतकऱ्यांची पांढऱ्या सोन्याची बाजारपेठ म्हणून खेतिया कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक आहे.

■ मुहूर्ताच्या वेळी स्थानिक व्यापाऱ्यांनी आमदार बर्डे यांना मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील करातील तफावतीची माहिती दिली. गेल्या हंगामात खेतिया बाजार समितीमध्ये ७,३८,७३५ क्चिटल कापसाची आवक झाली होती. यावेळी बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

हेही वाचा - Sericulture Success Story : रेशीम शेतीची माधवरावांना मिळाली साथ; अल्पभूधारक शेती उत्पन्नाला दिली आधुनिक वाट

टॅग्स :कापूसशेतकरीशेतीशेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डमध्य प्रदेश