Join us

Cotton Market:फुलंब्रीच्या मध्यम स्टेपलला क्विंटलमागे एवढा भाव, देऊळगाव राजा, सेलूतही भाव चांगला

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 14, 2024 3:45 PM

राज्यात सध्या कापसाची मोठी आवक होत असून आज दुपारपर्यंत ७२६१ क्विंटल कापसाची आवक झाली

राज्यात सध्या कापसाची मोठी आवक होत असून आज दुपारपर्यंत ७२६१ क्विंटल कापसाची आवक झाली. विदर्भातून सर्वाधिक कापूस येत असून आज छत्रपती संभाजीनगर मधील फुलंब्रीत मध्यम स्टेपल कापसाला क्विंटलमागे ८२०० रुपयांचा भाव मिळाला. 

वर्ध्यात आज ३८६० क्विंटल कापसाची आवक होत असून क्विंटलमागे सर्वसाधारण ६८७५ रुपयांचा भाव मिळत आहे. त्याखालोखाल नागपूरमधूनही कापसाची आवक वाढली असून आज ११३२ एच ४ मध्यम स्टेपल तर ३४३ नं १ मध्यम जातीचा कापूस विक्रीसाठी आला होता. यावेळी शेतकऱ्यांना ६८०० क्विंटल ते ७३०० रुपयांचा भाव मिळाला.

बुलढाण्यात आज ७५० क्विंटल कापसाची आवक झाली.  शेतकऱ्यांना यावेळी सर्वसाधारण ७५०० रुपये भाव मिळत आहे.

कुठे काय मिळाताहेत कापसाला भाव?

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/04/2024
अमरावती---64690074007150
मारेगावएच-४ - मध्यम स्टेपल286695075507250
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपल1132700072007100
देउळगाव राजालोकल750700077207500
वरोरालोकल420675075507000
वरोरा-खांबाडालोकल261620075507000
हिंगणघाटमध्यम स्टेपल2200600076506500
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपल1660700076907250
फुलंब्रीमध्यम स्टेपल145820082008200
नरखेडनं. १343630073006800
टॅग्स :कापूसबाजारमार्केट यार्ड