आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये एकूण २६ हजार ६६४ क्विंटल कापसाची आवक झाली. क्विंटलमागे ६,९०० ते ७४०० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला.मराठवाड्यातील परभणी ३३०० क्विंटल लोकल कापसाची आवक झाली. सर्वसाधारण ७४३० रुपये भाव मिळाला.बीड व परभणी सोडल्यास आज बहुतांश कापसाची आवक विदर्भातून झाली.
उर्वरित बाजार समित्यांमधून आज किती कापसाची आवक झाली? काय भाव मिळाला?
जिल्हा | जात/प्रत | आवक | कमीत कमी दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|
अकोला | लोकल | 206 | 6964 | 7155 |
बीड | --- | 60 | 6800 | 7025 |
बुलढाणा | लोकल | 2400 | 7000 | 7300 |
चंद्रपुर | --- | 360 | 6150 | 6575 |
चंद्रपुर | लोकल | 3471 | 6200 | 6667 |
जळगाव | मध्यम स्टेपल | 70 | 6070 | 6310 |
नागपूर | लोकल | 427 | 6600 | 6850 |
नागपूर | एच-४ - मध्यम स्टेपल | 640 | 6650 | 6800 |
परभणी | लोकल | 3300 | 6700 | 7430 |
वर्धा | --- | 1589 | 6200 | 6800 |
वर्धा | मध्यम स्टेपल | 14120 | 6000 | 6933 |
यवतमाळ | लोकल | 21 | 5800 |
दरम्यान, काल शनिवार असल्याने अनेक बाजार समित्यांमध्ये आवक घटल्याचे चित्र होते. यावेळी बाजारात केवळ मध्यम स्टेपल आणि लोकल कापसाचीआवक झाली होती. अकोला बाजार समितीत केवळ 66 क्विंटल कापसाची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 6930 रुपये तर सरासरी 7065 रुपये बाजारभाव मिळाला. काल याच बाजार समितीत 7090 रुपये बाजारभाव मिळाला होता. भद्रावती बाजार समितीत 360 क्विंटल कापसाची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 6150 रुपये तर सरासरी 6575 रुपये बाजारभाव मिळाला. यावल बाजार समितीत मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली होती. या ठिकाणी सरासरी 6310 रुपये बाजारभाव मिळाला.