Join us

cotton Market Today: आज राज्यात २६ हजार ६६४ क्विंटल कापसाची आवक, काय मिळाला भाव?

By मुक्ता सरदेशमुख | Published: February 25, 2024 4:46 PM

बीड व परभणी सोडल्यास आज बहुतांश कापसाची आवक विदर्भातून झाली. किती मिळाला भाव?

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये एकूण २६ हजार ६६४ क्विंटल कापसाची आवक झाली. क्विंटलमागे ६,९०० ते ७४०० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला.मराठवाड्यातील परभणी ३३०० क्विंटल लोकल कापसाची आवक झाली. सर्वसाधारण ७४३० रुपये भाव मिळाला.बीड व परभणी सोडल्यास आज बहुतांश कापसाची आवक विदर्भातून झाली.

उर्वरित बाजार समित्यांमधून आज किती कापसाची आवक झाली? काय भाव मिळाला?

जिल्हा

जात/प्रत

आवक

कमीत कमी दर

सर्वसाधारण दर

अकोला

लोकल

206

6964

7155

बीड

---

60

6800

7025

बुलढाणा

लोकल

2400

7000

7300

चंद्रपुर

---

360

6150

6575

चंद्रपुर

लोकल

3471

6200

6667

जळगाव

मध्यम स्टेपल

70

6070

6310

नागपूर

लोकल

427

6600

6850

नागपूर

एच-४ - मध्यम स्टेपल

640

6650

6800

परभणी

लोकल

3300

6700

7430

वर्धा

---

1589

6200

6800

वर्धा

मध्यम स्टेपल

14120

6000

6933

यवतमाळ

लोकल

21

5800

 

दरम्यान, काल शनिवार असल्याने अनेक बाजार समित्यांमध्ये आवक घटल्याचे चित्र होते. यावेळी बाजारात केवळ मध्यम स्टेपल आणि लोकल कापसाचीआवक झाली होती. अकोला बाजार समितीत केवळ 66 क्विंटल कापसाची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 6930 रुपये तर सरासरी 7065 रुपये बाजारभाव मिळाला. काल याच बाजार समितीत 7090 रुपये बाजारभाव मिळाला होता. भद्रावती बाजार समितीत 360 क्विंटल कापसाची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 6150 रुपये तर सरासरी 6575 रुपये बाजारभाव मिळाला. यावल बाजार समितीत मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली होती. या ठिकाणी सरासरी 6310 रुपये बाजारभाव मिळाला. 

टॅग्स :कापूसमार्केट यार्डबाजार