मागील महिनाभरापासून कापसाचे भाव गडगडत असल्याने शेतकऱ्यांना क्विंटलमागे साधारण १२०० रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. दरम्यान, आज राज्यात सलग दोन दिवसांच्या सुटीनंतर बाजार समित्या पुन्हा सुरु झाल्या.
पणन विभागाच्या आकडेवारीनुसार आज सकाळच्या सत्रात ५ हजार ५०८ क्विंटल कापसाची आवक झाली.प्रति क्विंटल साधारण ६७०० ते ६८५० रुपयांचा भाव मिळाला.
कोणत्या बाजारसमितीत काय मिळाला भाव?
काही शेतकऱ्यांनी दर वाढतील या आशेने कापूस साठवून ठेवला आहे पण दर खाली आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून दराकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
दोन दिवसाच्या खंडानंतर बाजारसमित्या पुन्हा सुरु
रविवार आणि सोमवारी अयोध्या राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेमुळे बहुतांश बाजार समित्या बंद होत्या. सलग दोन दिवसांच्या खंडानंतर आज पुन्हा बाजारसमित्या सुरु झाल्या आहेत.