यंदा कापसाच्या कमी उत्पादनाचा अंदाज असताना महाराष्ट्रातील अनेक बाजारसमित्यांमध्ये सध्या कापसाला हमीभावाहून अधिक भाव मिळत असल्याचे पणन विभागाने दिलेल्या माहितीवरून समजते.
दरम्यान, राज्यातील बहुतांश बाजारसमितींमध्ये कापसाचा भाव ६५०० ते ८००० रुपये सुरु आहे. यंदा कापसाचा भाव १० हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहचेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
यंदा कापसाचे उत्पादन कमी
केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार २०२३-२४ या वर्षात ३२३.११ लाख गाठी कापसाचे उत्पादन झाले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत हे कमी आहे. गेल्या आठवड्यात कापूस उत्पादनात घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर भावात काही सुधारणा होण्याची अपेक्षा होती. यंदा अवकाळी पावसाने गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव तसेच अल निनोच्या परिणामामुळे कापसाचे उत्पादन कमी होण्याची अपेक्षा आहे.
कोणत्या बाजारसमितीत काय मिळतोय भाव?
छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री बाजारसमितीत सोमवारी मध्यम स्टेपल कापसाला क्विंटलमागे सर्वसाधारण ८००० रुपयांचा भाव मिळाला. तर बहुतांश ठिकाणी ७००० रुपये क्विंटलच्या वर हा भाव गेल्याचे दिसते.
मंगळवारी एच ४ मध्यम स्टेपल कापसाला ७ हजाराहून अधिक भाव मिळत असल्याने आवकही होती. दरम्यान आज बुधवार दि २४ रोजी सकाळच्या सत्रात ५५३ क्विंटल कापसाची आवक झाली असून ७१०० ते ७५०० रुपयांचा भाव मिळत आहे.
काय आहे कापसाची आधारभूत किंमत?
कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने कापसाच्या दोन मूळ वाणांची आधारभूत किंमत ठरवली आहे. त्यानुसार मध्यम स्टेपल व लाँग स्टेपल कापसाची आधारभूत किंमत ६०८० व ६३८० रुपये असा आहे.
कसा सुरु आहे कापसाची आवक, काय मिळतोय दर?
जिल्हा | जात/प्रत | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|
24/04/2024 | |||||
बुलढाणा | लोकल | 423 | 7000 | 7800 | 7500 |
चंद्रपुर | लोकल | 130 | 6000 | 7400 | 7150 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) | 553 | ||||
23/04/2024 | |||||
बुलढाणा | लोकल | 317 | 6800 | 7750 | 7500 |
चंद्रपुर | लोकल | 220 | 6000 | 7400 | 7150 |
नागपूर | --- | 1500 | 7050 | 7100 | 7100 |
नागपूर | हायब्रीड | 475 | 6600 | 7100 | 6800 |
नागपूर | एच-४ - मध्यम स्टेपल | 291 | 6850 | 7100 | 7000 |
वर्धा | मध्यम स्टेपल | 3000 | 6000 | 7705 | 6500 |
यवतमाळ | --- | 2000 | 7000 | 7565 | 7500 |
यवतमाळ | एच-४ - मध्यम स्टेपल | 502 | 6850 | 7250 | 7050 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) | 8305 |