यंदा कापसाच्या दराने शेतकऱ्यांची निराशा केली असून कापासाला अपेक्षेपेक्षा कमी दर मिळत आहे. तर काही शेतकऱ्यांनी मागच्या हंगामातील कापूसही साठवून ठेवला आहे पण दर कमी असल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. यंदा देशांतर्गत कापसाचे उत्पादन कमी झाले असूनही दर कमी आहेत. तर केंद्र सरकारने कापसाच्या गाठी आयात केल्यामुळे दर कमी झाल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, आज ए.के.एच. ४ - लांब स्टेपल, मध्यम स्टेपल आणि लोकल कापसाची आवक झाली होती. देऊळगाव राजा येथे आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ५ हजार ५०० क्विंटल कापसाची आवक झाली होती. त्यानंतर भद्रावती आणि सेलू तालुक्यातील सिंदी येथेही मोठ्या प्रमाणात कापसाची आवक झाली आहे. नेर परसोपंत या बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे ५ हजार ८५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. हा दर हमीभावापेक्षा १ हजार २०० रूपयांनी कमी आहे.
अकोला बोरगावमंजू या बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ६ हजार ९७२ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये केवळ १४१ क्विंटल कापसाची आवक झाली होती. तर आज आष्टी वर्धा बाजार समितीमध्ये ए.के.एच. ४ - लांब स्टेपल या कापसाची आवक झाली होती.
जाणून घ्या आजचे कापसाचे सविस्तर दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
30/01/2024 | ||||||
अमरावती | --- | क्विंटल | 75 | 6600 | 6650 | 6625 |
भद्रावती | --- | क्विंटल | 1475 | 6300 | 6650 | 6475 |
आष्टी (वर्धा) | ए.के.एच. ४ - लांब स्टेपल | क्विंटल | 847 | 5800 | 6650 | 6400 |
अकोला | लोकल | क्विंटल | 130 | 5980 | 7080 | 6530 |
अकोला (बोरगावमंजू) | लोकल | क्विंटल | 141 | 6750 | 7195 | 6972 |
देउळगाव राजा | लोकल | क्विंटल | 5500 | 6200 | 6915 | 6775 |
नेर परसोपंत | लोकल | क्विंटल | 50 | 5850 | 5850 | 5850 |
काटोल | लोकल | क्विंटल | 373 | 6500 | 6750 | 6700 |
हिंगणा | लोकल | क्विंटल | 13 | 6500 | 6700 | 6500 |
सिंदी(सेलू) | मध्यम स्टेपल | क्विंटल | 2400 | 6500 | 6960 | 6700 |
फुलंब्री | मध्यम स्टेपल | क्विंटल | 165 | 6650 | 6800 | 6750 |