दोन दिवसांपासून कापसाच्या भावात तेजी असली तरी सोयाबीनचे दर काही वाढेनात. योग्य भाव मिळत नाही म्हणून शेतकरीवर्ग सोयाबीनबाजारपेठेत आणत नाही. परिणाम सोयाबीनची आवक कमी झालेली पाहायला मिळत आहे.
जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कापसाच्या भावात तेजी आलेली दिसत आहे. सोयाबीनचे भाव आठशे रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये सद्य:स्थितीत कापसाला प्रतिक्विंटल ७ हजार ५०० रुपये दराने भाव मिळत आहे. तर दुसरीकडे सोयाबीनच्या भावात अजूनही घसरण सुरूच आहे. सोयाबीनला ४४०० भाव मिळत आहे.
सोयाबीन उत्पादकांमध्ये पुन्हा चलबिचल...
गतवर्षीपेक्षा यावर्षी प्रतिक्विंटल ८०० रुपये भाव उतरल्याने शेतकरी सोयाबीन उत्पादकांत पुन्हा चलबिचल सुरू झाली आहे. कारण अनेक दिवसांपासून स्थिर असलेला भाव उतरला आहे. त्यामुळे सोयाबीन विकावे की घरी ठेवावे? असा प्रश्न सोयाबीन उत्पादकांना पडला आहे. सध्या बाजारपेठेत तुरीला प्रतिक्चिटल ९ ते १० रुपये भाव मिळत आहे. तर हरभऱ्याला ५५०० ते ५६०० प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.
कापसाला काय मिळतोय राज्यभरात भाव?
शेतमाल: कापूस
जिल्हा | आवक | कमीत कमी दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|
06/03/2024 | |||
अकोला | 156 | 7325 | 7563 |
अमरावती | 79 | 7350 | 7400 |
बुलढाणा | 1150 | 7300 | 7600 |
चंद्रपुर | 118 | 6400 | 6850 |
चंद्रपुर | 3057 | 6300 | 6900 |
हिंगोली | 72 | 7000 | 7250 |
नागपूर | 672 | 6533 | 7117 |
नागपूर | 1959 | 6600 | 7000 |
नागपूर | 988 | 6850 | 7000 |
परभणी | 1680 | 7650 | 7815 |
परभणी | 3000 | 6700 | 7875 |
वर्धा | 16950 | 6225 | 7017 |
यवतमाळ | 3 | 6800 | 6800 |
यवतमाळ | 1054 | 6800 | 7100 |
यवतमाळ | 124 | 6620 | 7100 |