Join us

कापसाच्या भावात तेजी, तर सोयाबीनचे दर काही वाढेनात, उत्पादकांमध्ये चलबिचल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 11:30 AM

दोन दिवसांपासून कापसाच्या भावात तेजी असली तरी सोयाबीनचे दर काही वाढेनात. योग्य भाव मिळत नाही म्हणून शेतकरीवर्ग सोयाबीन बाजारपेठेत ...

दोन दिवसांपासून कापसाच्या भावात तेजी असली तरी सोयाबीनचे दर काही वाढेनात. योग्य भाव मिळत नाही म्हणून शेतकरीवर्ग सोयाबीनबाजारपेठेत आणत नाही. परिणाम सोयाबीनची आवक कमी झालेली पाहायला मिळत आहे.

जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कापसाच्या भावात तेजी आलेली दिसत आहे. सोयाबीनचे भाव आठशे रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये सद्य:स्थितीत कापसाला प्रतिक्विंटल ७ हजार ५०० रुपये दराने भाव मिळत आहे. तर दुसरीकडे सोयाबीनच्या भावात अजूनही घसरण सुरूच आहे. सोयाबीनला ४४०० भाव मिळत आहे.

सोयाबीन उत्पादकांमध्ये पुन्हा चलबिचल...

गतवर्षीपेक्षा यावर्षी प्रतिक्विंटल ८०० रुपये भाव उतरल्याने शेतकरी सोयाबीन उत्पादकांत पुन्हा चलबिचल सुरू झाली आहे. कारण अनेक दिवसांपासून स्थिर असलेला भाव उतरला आहे. त्यामुळे सोयाबीन विकावे की घरी ठेवावे? असा प्रश्न सोयाबीन उत्पादकांना पडला आहे. सध्या बाजारपेठेत तुरीला प्रतिक्चिटल ९ ते १० रुपये भाव मिळत आहे. तर हरभऱ्याला ५५०० ते ५६०० प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.

कापसाला काय मिळतोय राज्यभरात भाव?

शेतमाल: कापूस

जिल्हाआवककमीत कमी दरसर्वसाधारण दर
06/03/2024
अकोला15673257563
अमरावती7973507400
बुलढाणा115073007600
चंद्रपुर11864006850
चंद्रपुर305763006900
हिंगोली7270007250
नागपूर67265337117
नागपूर195966007000
नागपूर98868507000
परभणी168076507815
परभणी300067007875
वर्धा1695062257017
यवतमाळ368006800
यवतमाळ105468007100
यवतमाळ12466207100
टॅग्स :कापूससोयाबीनबाजार