मागच्या तीन महिन्यांपासून कापूस, सोयाबीन आणि कांदा दराने माना टाकल्या आहेत. त्यामुळे सध्या शेतकरी हैराण असून अनेक शेतकऱ्यांना साठवेलला माल कसा विकायचा असा प्रश्न पडला आहे. दर वाढतील या अपेक्षेने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी मागच्या वर्षीचा कापूस साठवून ठेवला आहे पण दराने त्यांची निराशा केली. कापसाला ७ हजार २० रूपये हमीभाव जाहीर केला आहे पण आज एकाही बाजार समितीमध्ये तेवढा दर मिळाला नाही.
दरम्यान, आज पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार एच-४-मध्यम स्टेपल, हायब्रीड, लोकल, मध्यम स्टेपल या कापसाची आवक झाली होती. त्यामध्ये देऊळगाव राजा, मनवत आणि सेलू तालुक्यातील सिंदी येथे मोठ्या प्रमाणावर कापसाची आवक झाली होती. तर इतर बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक घटलेली दिसून येत आहे.
आज मनवत बाजार समितीमध्ये ६ हजार ८५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून किमान दर हा ६ हजार ५०० आणि कमाल दर हा ६ हजार ९३५ रूपये एवढा होता. हा सरासरी दर आजच्या दिवसातील सर्वांत जास्त दर होता. तर नेर परसोपंत बाजार समितामध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर ५ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला आहे. हा कापसाचा दर या हंगामातील सर्वांत कमी दर असून हा दर हमीभावापेक्षा २ हजार २० रूपयांनी कमी आहे.
आजचे कापसाचे सविस्तर दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
03/02/2024 | ||||||
अमरावती | --- | क्विंटल | 75 | 6600 | 6650 | 6625 |
भद्रावती | --- | क्विंटल | 710 | 6240 | 6700 | 6470 |
पारशिवनी | एच-४ - मध्यम स्टेपल | क्विंटल | 912 | 6650 | 6700 | 6675 |
मनवत | हायब्रीड | क्विंटल | 4800 | 6500 | 6935 | 6850 |
उमरेड | लोकल | क्विंटल | 843 | 6300 | 6640 | 6400 |
देउळगाव राजा | लोकल | क्विंटल | 4650 | 6000 | 6860 | 6700 |
नेर परसोपंत | लोकल | क्विंटल | 14 | 5000 | 5000 | 5000 |
मांढळ | लोकल | क्विंटल | 190 | 6350 | 6650 | 6450 |
हिंगणा | लोकल | क्विंटल | 28 | 6200 | 6711 | 6650 |
हिंगणघाट | मध्यम स्टेपल | क्विंटल | 9000 | 6000 | 6960 | 6300 |
यावल | मध्यम स्टेपल | क्विंटल | 458 | 6050 | 6710 | 6300 |
सिंदी(सेलू) | मध्यम स्टेपल | क्विंटल | 2030 | 6500 | 6975 | 6800 |