Todays Cotton Market Rates : राज्यात बाजारातील कापसाची आवक घटली आहे. मान्सूनचा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपातील लागवडीला सुरूवात केली आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांनी मागच्या वर्षीच्या हंगामातील कापूस दर वाढण्याच्या अपेक्षेने साठवून ठेवला होता. पण अद्याप कापसाला चांगला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आहे त्या किंमतीमध्ये कापसाची विक्री करावी लागत आहे.
दरम्यान, आज सावनेर, मनवत आणि हिंगणघाट बाजार समितीमध्ये (Market Yard) सर्वांत जास्त कापसाची आवक झाली होती. तर लोकल, मध्यम आणि एच-४-मध्यम स्टेपल कापसाची आवक होताना दिसत आहे. मनवत बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे १ हजार ३०० क्विंटल कापसाची आवक झाली होती.
तर मनवत बाजार समितीमध्ये ७ हजार ९०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून हा दर आजच्या दिवसातील राज्यातील एकूण बाजार समितींमधील सर्वोच्च सरासरी दर होता. त्याचबरोबर हिंगणघाट बाजार समितीमध्ये आज १ हजार क्विंटल कापसाची आवक झाली होती. तर येथे ६ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून हा दर आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर होता.
(Maharashtra Market Cotton Rates)
आजचे सविस्तर कापसाचे दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
29/06/2024 | ||||||
अमरावती | --- | क्विंटल | 70 | 6700 | 7550 | 7125 |
सावनेर | --- | क्विंटल | 850 | 7100 | 7150 | 7150 |
पारशिवनी | एच-४ - मध्यम स्टेपल | क्विंटल | 47 | 7200 | 7300 | 7250 |
मनवत | लोकल | क्विंटल | 1300 | 6900 | 7975 | 7900 |
हिंगणघाट | मध्यम स्टेपल | क्विंटल | 1000 | 6000 | 7900 | 6500 |