Lokmat Agro >बाजारहाट > अर्थसंकल्पाच्या दिवशी कापसाचे दर वाढले! पाहा कुठे किती मिळाला दर?

अर्थसंकल्पाच्या दिवशी कापसाचे दर वाढले! पाहा कुठे किती मिळाला दर?

Cotton rates hiked on Budget day! See where the rate is? | अर्थसंकल्पाच्या दिवशी कापसाचे दर वाढले! पाहा कुठे किती मिळाला दर?

अर्थसंकल्पाच्या दिवशी कापसाचे दर वाढले! पाहा कुठे किती मिळाला दर?

राज्यभरातील कापसाला किती मिळाला दर, जाणून घ्या सविस्तर

राज्यभरातील कापसाला किती मिळाला दर, जाणून घ्या सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

मागच्या अनेक दिवसांपासून पडलेले कापसाचे दर आता वाढले असल्याचं आजच्या बाजार दरावरून दिसून येत आहे. आज पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार १७ बाजार समित्यांमध्ये कापसाचे लिलाव पार पडले असून त्यातील ७ बाजार समित्यांमध्ये ७ हजारांपेक्षा जास्त  दर मिळाला. तर मागच्या काही दिवसांचा विचार केला तर ७ हजारांच्या खाली दर होते. तर किमान दरानेही पातळी ओलांडली होती. 

 दरम्यान, आज एच-४ - मध्यम स्टेपल, मध्यम स्टेपल, लोकल कापसाची आवक झाली होती. त्यामध्ये सिंदी-सेलू, वर्धा, हिंगणघाट, वरोरा-खांबाडा, वरोरा, देऊळगाव राजा, मनवत,पारशिवणी, मारेगाव, राळेगाव या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर कापसाची आवक झाली होती. हिंगणघाट येथे आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ७ हजार ७०० क्विंटल कापसाची आवक झाली होती. तर नेर परसोपंत बाजार समितीमध्ये केवळ ६ हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार, सोनपेठ बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील निच्चांकी म्हणजे २ हजार ४५१ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून या बाजार समितीमध्ये केवळ ४७ क्विंटल कापसाची आवक झाली होती. तर मनवत बाजार समितीमध्ये ७ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. आज दिवसभरात सात बाजार समित्यांमध्ये ७ हजारांपेक्षा जास्त सरासरी दर मिळाला आहे. यावरून कापसाच्या दरात सुधारणा झाल्याचे चित्र आहे.

आजचे सविस्तर कापसाचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/02/2024
अमरावती---क्विंटल70700071007050
राळेगाव---क्विंटल6000665073657250
भद्रावती---क्विंटल292620072006700
मारेगावएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल1197685070506950
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल1292670070006850
सोनपेठएच - ६ - मध्यम स्टेपलक्विंटल47220026512451
उमरेडलोकलक्विंटल478690072007100
मनवतलोकलक्विंटल3600650077057600
देउळगाव राजालोकलक्विंटल2500680077007400
वरोरालोकलक्विंटल2449600074016700
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल1425610073006700
आखाडाबाळापूरलोकलक्विंटल68700073007150
नेर परसोपंतलोकलक्विंटल11600060006000
काटोललोकलक्विंटल135660071006800
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल7700600075306700
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल1500650073256950
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल2620655075157400

Web Title: Cotton rates hiked on Budget day! See where the rate is?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.