Market Yard Cotton Rates : मागच्या हंगमातील कापूस अजूनही शेतकऱ्यांनी साठवून ठेवला असून बाजारातील आवक अजूनही मोठ्या प्रमाणावर सुरूच असल्याचे चिन्हे आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांना ७ हजारांच्या आसपास सरासरी दर प्रतिक्विंटल मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस साठवून ठेवल्याचा फायदा मिळत नसल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, आज राज्यातील अकोट बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजे २ हजार ४६५ क्विंटल कापसाची आवक झाली होती. तर सावनेर बाजार समितीत ७०० क्विंटल कापसाची आवक झाली होती. अमरावती आणि यावल बाजार समितीमध्ये अनुक्रमे ६४ आणि ६५ क्विंटल कापसाची आवक झाली होती. मध्यम स्टेपल आणि एच-४-मध्यम स्टेपल कापसाची आवक सध्या बाजारात होताना दिसत आहे.
आजचा सर्वाधिक सरासरी दर हा सावनेर बाजार समितीमध्ये ८ हजार १०० रूपये एवढा मिळाला असून येथे ८ हजार १३५ एवढा कमाल दर मिळाला. तर आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर हा यावल बाजार समितीमध्ये मिळाला असून येथे ६ हजार ६०० रूपये दर मिळाला आहे. तर याच बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील किमान दर ६ हजार २३० रूपये एवढा मिळाला आहे.
आजचे सविस्तर कापसाचे दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
04/07/2024 | ||||||
अमरावती | --- | क्विंटल | 65 | 6700 | 7550 | 7125 |
सावनेर | --- | क्विंटल | 700 | 7100 | 7100 | 7100 |
अकोट | एच-४ - मध्यम स्टेपल | क्विंटल | 2465 | 7350 | 8135 | 8100 |
यावल | मध्यम स्टेपल | क्विंटल | 64 | 6230 | 7110 | 6600 |