Join us

Cotton Rates Today : मागच्या हंगामातील कापसाची अजूनही आवक! किती मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 8:05 PM

Cotton Rates Market Yard : मागच्या हंगामातील कापूस अजूनही शेतकऱ्यांना दर मिळेल या अपेक्षेने ठेवला होता. पण शेतकऱ्यांना कमी दरातच कापूस विक्री करावा लागत आहे.

Market Yard Cotton Rates : मागच्या हंगमातील कापूस अजूनही शेतकऱ्यांनी साठवून ठेवला असून बाजारातील आवक अजूनही मोठ्या प्रमाणावर सुरूच असल्याचे चिन्हे आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांना ७ हजारांच्या आसपास सरासरी दर प्रतिक्विंटल मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस साठवून ठेवल्याचा फायदा मिळत नसल्याचं दिसून येत आहे. 

दरम्यान, आज राज्यातील अकोट बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजे २ हजार ४६५ क्विंटल कापसाची आवक झाली होती. तर सावनेर बाजार समितीत ७०० क्विंटल कापसाची आवक झाली होती. अमरावती आणि यावल बाजार समितीमध्ये अनुक्रमे ६४ आणि ६५ क्विंटल कापसाची आवक झाली होती. मध्यम स्टेपल आणि एच-४-मध्यम स्टेपल कापसाची आवक सध्या बाजारात होताना दिसत आहे. 

आजचा सर्वाधिक सरासरी दर हा सावनेर बाजार समितीमध्ये ८ हजार १०० रूपये एवढा मिळाला असून येथे ८ हजार १३५ एवढा कमाल दर मिळाला. तर आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर हा यावल बाजार समितीमध्ये मिळाला असून येथे ६ हजार ६०० रूपये दर मिळाला आहे. तर याच बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील किमान दर ६ हजार २३० रूपये एवढा मिळाला आहे. 

आजचे सविस्तर कापसाचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/07/2024
अमरावती---क्विंटल65670075507125
सावनेर---क्विंटल700710071007100
अकोटएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल2465735081358100
यावलमध्यम स्टेपलक्विंटल64623071106600
टॅग्स :मार्केट यार्डबाजारकापूसकॉटन मार्केट