Lokmat Agro >बाजारहाट > Cotton Rates Today : आज केवळ एकाच बाजार समितीत मिळाला हमीभावाएवढा दर

Cotton Rates Today : आज केवळ एकाच बाजार समितीत मिळाला हमीभावाएवढा दर

Cotton Rates Today: Today, only one market committee got the rate equal to the guaranteed price | Cotton Rates Today : आज केवळ एकाच बाजार समितीत मिळाला हमीभावाएवढा दर

Cotton Rates Today : आज केवळ एकाच बाजार समितीत मिळाला हमीभावाएवढा दर

सध्या राज्यातील महत्त्वाच्या असलेल्या पिकाला चांगला दर नसल्याने शेतकऱ्यांचा सरकारवर रोष आहे. 

सध्या राज्यातील महत्त्वाच्या असलेल्या पिकाला चांगला दर नसल्याने शेतकऱ्यांचा सरकारवर रोष आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

कापसाच्या दराने यंदा शेतकऱ्यांना निराश केले असून ज्या शेतकऱ्यांनी दर वाढण्याच्या आशेने कापूस साठवून ठेवला होता अशा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. सध्या उन्हाळा सुरू झाला असून कापसाचे उत्पादन घटू लागले आहे. परिणामी बाजारातील आवकसुद्धा घटत असून दर हमीभावापेक्षा कमी मिळत आहेत. सध्या राज्यातील महत्त्वाच्या असलेल्या पिकाला चांगला दर नसल्याने शेतकऱ्यांचा सरकारवर रोष आहे. 

दरम्यान, पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज एच-४-मध्यम स्टेपल, लोकल, मध्यम स्टेपल, नं.१ या कापसाची आवक झाली असून सिंदी-सेलू, हिंगणघाट आणि राळेगाव या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर कापसाची आवक झाली होती.  तर राळेगा येथे सर्वांत जास्त म्हणजे ४ हजार ३०० क्विंटल कापसाची आवक झाली होती. 

आजच्या उच्चांकी आणि निच्चांकी दराचा विचार केला तर आज कापसाला सर्वांत जास्त दर हा फुलंब्री बाजार समितीमध्ये  ८ हजार २०० रूपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला आहे. तर मांढळ बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे ७ हजार २०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

आजचे सविस्तर कापसाचे दर
 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/03/2024
राळेगाव---क्विंटल4300670076507500
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल637680072007050
अकोलालोकलक्विंटल29750075007500
उमरेडलोकलक्विंटल246680073407200
देउळगाव राजालोकलक्विंटल400700078257600
वरोरालोकलक्विंटल354560076507000
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल160700075507300
मांढळलोकलक्विंटल50600065006250
हिंगणालोकलक्विंटल23680072007200
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल3000600078006700
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल32720074007300
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल1300650077007000
फुलंब्रीमध्यम स्टेपलक्विंटल84820082008200
नरखेडनं. १क्विंटल249630071006500

Web Title: Cotton Rates Today: Today, only one market committee got the rate equal to the guaranteed price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.