Lokmat Agro >बाजारहाट > कापूस विक्रीला सुरुवात, प्रतिक्विंटल किती मिळतोय भाव?

कापूस विक्रीला सुरुवात, प्रतिक्विंटल किती मिळतोय भाव?

Cotton sales start, how much price is getting per quintal? | कापूस विक्रीला सुरुवात, प्रतिक्विंटल किती मिळतोय भाव?

कापूस विक्रीला सुरुवात, प्रतिक्विंटल किती मिळतोय भाव?

पाचोडच्या बाजारात नवीन कापसाची आवक

पाचोडच्या बाजारात नवीन कापसाची आवक

शेअर :

Join us
Join usNext

पैठण तालुक्यातील पाचोड येथील आठवडी बाजारात नवीन कापूस  विक्रीला येण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी कापसाला ७ हजार १०० रुपये एवढा भाव मिळाला.

पाचोडसह परिसरात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत पावसाने दडी मारल्याने त्याचा परिणाम खरीप पिकांवर झाला. फटका बसला तरी शेतकऱ्यांनी आटापिटा करून कपाशी जगविली. सध्या परिसरात अनेक ठिकाणी कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. रविवारी काही शेतकऱ्यांनी वेचलेला नवीन कापूस बाजारात विक्रीसाठी आणला होता. या कापसाला खाजगी व्यापाऱ्यांनी ७ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव दिला. कापसाच्या दरात आणखी वाढ व्हावी, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. सध्या थोडा थोडा कापूस शेतकरी विक्रीसाठी आणत असल्याचे व्यापारी संजयकुमार सेठी यांनी सांगितले.

एक एकर कपाशीचे पीक घ्यायचे म्हटले तर साधारणपणे ४० ते ४५ हजारांच्या आसपास खर्च आला आहे. दुसऱ्या बाजूला समाधानकारक भाव नसल्याने तसेच कापसाची चोरी सुरु असल्याने कापूस पिकावर केलेला खर्च फिटणे देखील अवघड आहे.- सुनील येवले,कापूस उत्पादक शेतकरी

शेतकऱ्यांना कापूस उत्पादनासाठी किती खर्च येतो?

नांगरट २४००
रोटा  २२००
सरी १५००
बियाणे १६०० (दोन बॅगा
मजुरी ८०० (लागवड)
खते। १० हजार
खुरपणी १० हजार
फवारणी १० हजार


 

Web Title: Cotton sales start, how much price is getting per quintal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.