Join us

कापूस विक्रीला सुरुवात, प्रतिक्विंटल किती मिळतोय भाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 3:00 PM

पाचोडच्या बाजारात नवीन कापसाची आवक

पैठण तालुक्यातील पाचोड येथील आठवडी बाजारात नवीन कापूस  विक्रीला येण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी कापसाला ७ हजार १०० रुपये एवढा भाव मिळाला.

पाचोडसह परिसरात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत पावसाने दडी मारल्याने त्याचा परिणाम खरीप पिकांवर झाला. फटका बसला तरी शेतकऱ्यांनी आटापिटा करून कपाशी जगविली. सध्या परिसरात अनेक ठिकाणी कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. रविवारी काही शेतकऱ्यांनी वेचलेला नवीन कापूस बाजारात विक्रीसाठी आणला होता. या कापसाला खाजगी व्यापाऱ्यांनी ७ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव दिला. कापसाच्या दरात आणखी वाढ व्हावी, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. सध्या थोडा थोडा कापूस शेतकरी विक्रीसाठी आणत असल्याचे व्यापारी संजयकुमार सेठी यांनी सांगितले.

एक एकर कपाशीचे पीक घ्यायचे म्हटले तर साधारणपणे ४० ते ४५ हजारांच्या आसपास खर्च आला आहे. दुसऱ्या बाजूला समाधानकारक भाव नसल्याने तसेच कापसाची चोरी सुरु असल्याने कापूस पिकावर केलेला खर्च फिटणे देखील अवघड आहे.- सुनील येवले,कापूस उत्पादक शेतकरी

शेतकऱ्यांना कापूस उत्पादनासाठी किती खर्च येतो?

नांगरट २४००रोटा  २२००सरी १५००बियाणे १६०० (दोन बॅगामजुरी ८०० (लागवड)खते। १० हजारखुरपणी १० हजारफवारणी १० हजार

 

टॅग्स :कापूसमार्केट यार्डबाजारऔरंगाबाद