भाजीच्या चवीसाठी असलेल्या लसणाची फोडणी सध्या चांगलीच कडाडली आहे. गेल्या काही दिवसांपासून लसणाचे भाव गगनाला पोहोचले आहेत. सध्या बाजारात लसूण प्रतिकिलो २८० ते ३६० रुपये तर गावराण लसून चारशे रुपयावर पोहोचल्यामुळे ग्राहकांना अधिकचा भार सहन करावा लागत आहे. लसणाचे दर वाढल्यामुळे स्वयंपाकात वापरल्या जाणान्या लसणाची जागा कमी होताना दिसत आहे. गावरान लसूण तर चारशेच्या पार गेल्याने ग्राहकांना परवडेना अशी स्थिती आहे.
देशी लसूण दुर्मीळ
पूर्वी बाजारात गावरान लसूण सहज उपलब्ध होत होता. आता मात्र शेतकरी देशी लसूण लागवड करीत नसल्याने जिल्ह्यात देशी लसूण दुर्मीळ झाल्याचे चित्र बाजारात दिसते. देशी लसूण विक्री करणारे बाजारात एक- दोन विक्रेतेच दिसतात. दिवाळीनंतर १२० रुपयांची भाववाढ रुपयांची वाढ दिवाळीपूर्वी लसणाचे भाव १८० रुपयांपर्यंत होते. दिवाळीनंतर मात्र लसणाचे दर वाढले. बाजारात लसणाचे दर सातत्याने वाढत आहेत. किरकोळ बाजारसह होलसेल बाजारपेठेत साधा लसून ७० रुपये पाव किलो दराने मिळत आहे. तर रस्त्यावरील लसूणदेखील २८० ते ३०० रुपयांपर्यंत विक्री होताना दिसून येत आहे.
का वाढले भाव?
जिल्ह्यात सध्या लसणाची आवक घटली आहे. त्या तुलनेत मागणी अधिक आणि आवक कमी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लसणाचे भाव वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
कोठून होते आवक?
मध्य प्रदेश व गुजरातमधून लसणाची आवक होते. सध्या आवक कमी असल्याने भावदेखील वाढले आहेत. आणखी एक ते दीड महिना भाव वाढतेच राहणार आहेत. त्यानंतर कमी होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर लसणाचे भाव सातत्याने वाढत आहेत. आणखी दीड ते दोन महिने लसणाचे दर स्थिर राहतील, त्यानंतर काही प्रमाणात दरात कमी होण्याची शक्यता आहे. कर्नाटकातून लसणाची आवक होत असल्याची माहिती मिळाली आहे. आवक कमी होत असल्याने भावदेखील वाढले आहेत.
काय आहेत आजचे दर?
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | आवक | सर्वसाधारण दर |
---|---|---|
अकलुज | 10 | 18000 |
अकोला | 275 | 21000 |
श्रीरामपूर | 15 | 15000 |
राहता | 4 | 22000 |
हिंगणा | 1 | 24000 |
नाशिक | 40 | 17500 |
कल्याण | 13 | 19500 |
अमरावती- फळ आणि भाजीपाला | 240 | 19000 |
पुणे | 778 | 21000 |
पुणे-मोशी | 43 | 15000 |