Join us

सांगलीत बेदाण्याला प्रतिकिलो १०० ते १८० रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2023 9:49 AM

व्यापारी आणि अडत्यांमधील पैशाची देणे-घेण्याचा हिशेब घेण्यासाठी महिनाभर बेदाणा सौदे बंद होते. महिन्यानंतर बुधवारी निघालेल्या सौद्यात ३५० टन बेदाण्याची आवक झाली होती.

व्यापारी आणि अडत्यांमधील पैशाची देणे-घेण्याचा हिशेब घेण्यासाठी महिनाभर बेदाणा सौदे बंद होते. महिन्यानंतर बुधवारी निघालेल्या सौद्यात ३५० टन बेदाण्याची आवक झाली होती. बेदाण्यास प्रतिकिलो १०० ते १८० रुपयांचा सरासरी दर शेतकऱ्यांना मिळाला आहे. बेदाण्याच्या दरात काहीही सुधारणा नसल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

व्यापारी आणि अडत्यांचा हिशेब देण्याचा प्रश्न १०० टक्के पूर्ण झाला नाही. यामुळे काही व्यापाऱ्यांना बेदाणा सौद्यातून बाहेर ठेवण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासन आणि बेदाणा आसोसिएशनने घेतला होता; पण दोन व्यापाऱ्यांनी थकीत रकमेचे धनादेश अडत्यांना दिले आहेत. त्यामुळे त्या व्यापाऱ्यांना पुन्हा बेदाणा सौद्यात संधी दिली आहे. पहिल्याच दिवशीच्या सांगलीमार्केट यार्डात निघालेल्या सौद्यात ३५ गाड्यांमधून ३५० टन बेदाण्याची आवक झाली होती, अशी माहिती सांगलीबाजार समितीचे सभापती सुजय शिंदे व सचिव महेश चव्हाण यांनी दिली. मार्केट यार्डमध्ये बुधवारी १६ दुकानांमध्ये बेदाण्याची आवक झाली होती. पप्पू मजलेकर यांच्या दुकानात चांगल्या दर्जाच्या ३६ बॉक्समधील बेदाण्यास प्रतिकिलो १८० रुपये दर मिळाला. सरासरी चांगल्या दर्जाच्या बेदाण्यास प्रतिकिलो १३० ते १८० रुपये, मध्यम बेदाण्यास १०० ते १२० रुपये, तर काळ्या बेदाण्यास ४० ते ८० रुपये दर मिळाला आहे.

बेदाण्याचे सध्याचे दरचांगला बेदाणा - १३० ते १८०मध्यम दर्जा - १०० ते १२०काळा बेदाणा - ४० ते ८०

यावेळी मनीष मालू, पवन चौगुले, अरुण शेडबाळे, अभिजित पाटील, वृषभ शेडबाळे, इम्तियाज तांबोळी, अश्विन पटेल, रवी पाटील, राजाभाई पटेल, सोमनाथ मनोली, कृष्णा मर्दा, नितीन अट्टल, हरीश पाटील, विनीत गड्डे, प्रवीण यादवडे, रुपेश पारेख, गगन अग्रवाल, दगडू कचरे, प्रशांत भोसले, अजित पाटील, अनिल पाटील, विनोद कबाडे, गिरीश मालू, देवेंद्र करे आदींसह व्यापारी उपस्थित होते.

टॅग्स :मार्केट यार्डबाजारसांगलीशेतकरीपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती