Join us

Custard Apple Market : सीताफळ लिलावाने ओलांडला चार वर्षांतील उच्चांक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 2:07 PM

(Custard Apple Market)

मोर्शी तालुक्यातील खेड येथील सीताफळ लिलावाने चार वर्षांतील उच्चांक ओलांडला असून ३ लाख ९० हजारांच्या सर्वाधिक बोलीने या बनातील फळांची विक्री यंदा पार पडली. मोर्शी वन परिक्षेत्राधिकारी अमोल चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील खेड येथील सीताफळ हे पूर्णपणे सेंद्रिय व चवीला अत्यंत चविष्ट म्हणून प्रसिद्ध आहे. 

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात वनपरिक्षेत्र कार्यालयात झालेल्या लिलावात ३ लाख ९० हजार रुपये इतकी अंतिम बोली लागली. 

खेड येथील संपूर्ण १४२ हेक्टर वनजमीन सीताफळ लागवड योग्य असून त्यापैकी शंभर हेक्टर क्षेत्रावर सीताफळ लागवड करावी, यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे.

याचाच एक भाग म्हणून यावर्षी काही दिवसांपूर्वी पंचवीस हजार सीताफळ रोपांची लागवड वनजमिनीवर करण्यात आली आहे.

दहा वर्षांपूर्वी दुपटीने लिलाव दहा वर्षांपूर्वी याच वनाचा लिलाव साडेसहा लाख रुपयांपर्यंत गेल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान लिलावात सहभागी होण्यासाठी विविध ठिकाणचे व्यापारी आले होते.

सिताफळातील औषधी आणि आयुर्वेदीक गुणधर्म

* सिताफळाच्‍या झाडातील औषधी आणि आयुर्वेदीक गुणधर्म देखील मोलाचे आहेत.  पानांचा वापर कडवट औषधे बनविण्‍यासाठी केला जातो तर बियांपासून तेलनिर्मिती करता येते.

* या तेलाचा उपयोग साबण निर्मितीसाठी केला जातो. ढेपेचा उपयोग खत म्‍हणून करतात.

* सिताफळांची भूकटी (पावडर) करून ती आईस्‍क्रीम बनविण्‍यासाठी वापरली जाते. तो एक छोटासा कुटिर उद्योग घरबसल्‍या महिलांना करण्‍यासारखा आहे.

* सिताफळाची मोठी झाडे जूनी झाली म्‍हणजे खोडावरील खरखरीत सालींची आणि वेडयावाकडया टणक वाळलेल्‍या फळांची कुटून बारीक पावडर करून ती कातडी कमविण्‍याच्‍या धंदयात देखिल वापराता येते.

टॅग्स :शेती क्षेत्रलागवड, मशागतशेतकरीशेती