सांगली : येथील विष्णू अण्णा पाटील फळ मार्केटमध्ये डाळिंबाची आवक कमी झाल्यामुळे त्याचा भाव चांगलाच वाढला आहे. प्रतिक्विंटल आठ हजार ५०० ते १० हजार रुपये दर बुधवारी सौद्यामध्ये मिळाला आहे. सांगली शहरात डाळिंबाची किरकोळ विक्री प्रतिकिलो १५० ते २०० रुपयांनी सुरू आहे.
मोसंबीला प्रतिक्विंटल ८ हजार ते १० हजार रुपये तर हलक्या प्रतीच्या मोसंबीला सहा हजार रुपये दर होता. सीताफळाची आवकही कमी आहे. यामुळे सीताफळास प्रतिक्विंटल तीन हजार ५०० ते पाच हजार दर होता. सफरचंदचा भाव तेजीतच आहे.
प्रतिक्विंटल १२ हजार ५०० ते २० हजार रुपये दर आहे. फळामध्ये सर्वाधिक दर हा सफरचंदला मिळत आहे. ड्रॅगनफ्रुटचीही आवक वाढली आहे. प्रति क्विंटल पाच हजार ५०० ते आठ हजार रुपये दर मिळत आहे. फळांची आवक कमी असल्यामुळे सर्वच फळांचे दर जास्त असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.