Lokmat Agro >बाजारहाट > Dalimb Market : बारामती बाजारात डाळिंबाची मोठी आवक किलोला मिळाला असा दर

Dalimb Market : बारामती बाजारात डाळिंबाची मोठी आवक किलोला मिळाला असा दर

Dalimb Market: How much the price of pomegranates received per kg in Baramati market | Dalimb Market : बारामती बाजारात डाळिंबाची मोठी आवक किलोला मिळाला असा दर

Dalimb Market : बारामती बाजारात डाळिंबाची मोठी आवक किलोला मिळाला असा दर

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे जळोची उपबाजार येथील फळे व भाजी मार्केटमध्ये डाळिंबाची २०० क्रेटची आवक झाली. यावेळी डाळिंबास प्रति किलोस रु. २००/- असा उच्चांकी दर मिळाला.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे जळोची उपबाजार येथील फळे व भाजी मार्केटमध्ये डाळिंबाची २०० क्रेटची आवक झाली. यावेळी डाळिंबास प्रति किलोस रु. २००/- असा उच्चांकी दर मिळाला.

शेअर :

Join us
Join usNext

बारामती : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे जळोची उपबाजार येथील फळे व भाजी मार्केटमध्ये डाळिंबाची २०० क्रेटची आवक झाली. यावेळी डाळिंबास प्रति किलोस रु. २००/- असा उच्चांकी दर मिळाला, तर प्रति क्रेटस् १८०० ते ४००० रुपये दर मिळाला.

डाळिंबास प्रति किलोस किमाल दर रु. ९० व सरासरी दर रु. १५० प्रति किलो दर निघाले. संजय गदादे यांचे आडतीवर पणदरे येथील डाळिंब उत्पादक शेतकरी माधवराव कोकरे यांचे डाळिंबास हा २०० रुपये प्रति किलो दर मिळाला.

बाजार आवारात भारत वारभुवन, अक्षय चव्हाण, कमलेश शिंदे, एकता फ्रूट हे अडतदार असून जळोची मार्केट मध्ये बारामतीसह इंदापूर, दौंड, फलटण, कर्जत, श्रीगोंदा या तालुक्यातून आवक होत आहे.

आठवड्यातून साधारण १०० ते १००० क्रेटस्ची डाळिंब आवक होत आहे. डाळिंब खरेदीसाठी बारामती तालुक्यासह बिहार, कानपूर व दिल्ली येथील खरेदीदार येत आहेत. हे डाळिंब किरकोळ विक्रीसाठी तसेच बिहार, कानपूर, दिल्ली या ठिकाणी पाठविले जात आहे.

मागणी वाढत असल्याने शेतकऱ्यांना डाळिंबास चांगला दर मिळत आहेत, अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल ग्रेडिंग व सॉर्टिंग करून आणावा, म्हणजे आणखी जादा दर मिळेल.

स्थानिक बाजारपेठेत किरकोळ विक्रीसाठी आणि बाहेरील राज्यात मागणी असल्याने आणखी दर वाढतील, असे अपेक्षित आहे. सध्या शेतकऱ्यांना डाळिंबास चांगला दर मिळत असल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.

शेतकऱ्यांना फायदा
जळोची मार्केटमध्ये उभारलेले फळे व भाजीपाला खरेदी-विक्रीकरिता सेलहॉल तसेच शेतकऱ्यांना पुरविलेल्या विविध सुविधा यामुळे शेतकऱ्यांची व व्यापारी वर्गाची सोय झालेली आहे. या सुविधेचा उपयोग बाजार घटकांना होत आहे. समितीने बाहेरील डाळिंब व्यापाऱ्यांशी संपर्क साधला असून लवकरच खरेदीदार वाढतील. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल बारामती बाजार समितीचे आवारात विक्रीस आणावा, असे आवाहन समितीचे सभापती सुनील पवार व उपसभापती नीलेश लडकत यांनी केले आहे.

Web Title: Dalimb Market: How much the price of pomegranates received per kg in Baramati market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.