Join us

मालेगाव कृउबात आवक वाढली; अधिकमासामुळे लिंबूच्या मागणीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2023 12:56 PM

बाजार समितीत कोथिंबिरीची जुडी अवघ्या दोन रुपयांना विकली जात होती. दरम्यान, टोमॅटो मात्र भाव खाऊन असून २००० रूपये भाव मिळाला.

मालेगाव तालुक्यात अद्यापही समाधानकारक पावसाची नोंद नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबू आणि कोथिंबिरीची आवक वाढली असून भावही घसरले आहेत. बाजार समितीत कोथिंबिरीची जुडी अवघ्या दोन रुपयांना विकली जात होती. दरम्यान, टोमॅटो मात्र भाव खाऊन असून २००० रूपये भाव मिळाला.

गुरुवारी (दि. २७) क्रेट्समागे १६०० ते शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. शेतकरी शेतमालाला विक्री करत दुसरे मकासारखे पीक घेण्यासाठी पाऊस नसला तरी अन्य ठिकाणी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर आवक पावसाने उशिराने हजेरी लावली.

मात्र, पुन्हा पावसाने ओढ दिलेली आहे. त्यात शेतकऱ्यांकडून लिंबू समितीत विक्रीसाठी आणला जात आहे. सध्या मिळेल त्या भावात त्यामुळे शेतातील आहे ते पीक काढून अनेकजण श्रावणात लिंबू खात नाहीत.

मालेगाव तालुक्यात सध्या पावसाबाबत चिंतेचेच वातावरण आणि कोथिंबिरीचा शेतमाल बाजार होताना दिसून येत आहे. अगोदरच श्रावण अधिकमास सुरू आहे. त्यामुळे त्याचाही परिणाम शेतीमालावर होऊन कायम आहे. चार-पाच दिवसांपूर्वी थोडाफार पाऊस पडल्याने शेतकरी मिळेल त्या भावात माल विक्रीला पसंती देत आहेत. सध्या लिंबांनाही मागणी कमी झालेली आहे. पाऊस सुरू असल्याने बाहेर शेतमाल पाठविणे अवघड होऊन बसले. भाव घसरण्यावर होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

टोमॅटो २०० रुपये किलो■ मालेगाव बाजार समितीत गुरुवारी टोमॅटोचे भाव प्रति क्रेट्समागे १६०० ते २००० रुपये होते.■ टोमॅटो अजूनही भाव खात आहे. बाजार समितीत भाव २००० रुपये क्रेट्समागे असले तरी किरकोळ बाजारात प्रतिकिलो २०० रुपयांनी टोमॅटो विक्री होत आहे.■ पावशेर टोमॅटोसाठी ५० ते ६० रुपये मोजावे लागत असल्याने ग्राहकांनीही खरेदीसाठी हात आखडता घेतला आहे.

टॅग्स :बाजारमोसमी पाऊस