Lokmat Agro >बाजारहाट > चालू वर्षी खाद्य तेलाच्या आयातीत झाली घट, जाणून घ्या किती?

चालू वर्षी खाद्य तेलाच्या आयातीत झाली घट, जाणून घ्या किती?

decline in edible oil imports this year | चालू वर्षी खाद्य तेलाच्या आयातीत झाली घट, जाणून घ्या किती?

चालू वर्षी खाद्य तेलाच्या आयातीत झाली घट, जाणून घ्या किती?

सन २३-२४ (नोव्हेंबर ते फेब्रुवारी) मध्ये, खाद्य आणि अखाद्य अशा दोन्ही तेलांसह एकूण तेल आयातीत २१ टक्के घट नोंदवली गेली आहे. एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) च्या मते, या कालावधीत एकूण ४६.४७ लाख टन तेलाची आयात झाली होती, तर मागील काळात हा आकडा ५८.८७ लाख टन होता.

सन २३-२४ (नोव्हेंबर ते फेब्रुवारी) मध्ये, खाद्य आणि अखाद्य अशा दोन्ही तेलांसह एकूण तेल आयातीत २१ टक्के घट नोंदवली गेली आहे. एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) च्या मते, या कालावधीत एकूण ४६.४७ लाख टन तेलाची आयात झाली होती, तर मागील काळात हा आकडा ५८.८७ लाख टन होता.

शेअर :

Join us
Join usNext

यंदाच्या वर्षी देशातील खाद्य तेलाच्या आयातीत घट झाली आहे. मात्र त्या तुलनेत आयातीतला रिफाइंड तेलाचा वाटा वाढला आहे. याआधीच्या आयातीच्या तुलनेत रिफाइंड तेलाच्या आयातीतही घट झाली आहे. याशिवाय  कच्च्या तेलाची आयात झपाट्याने कमी झाली आहे. 

सन २३-२४ (नोव्हेंबर ते फेब्रुवारी) मध्ये, खाद्य आणि अखाद्य अशा दोन्ही तेलांसह एकूण तेल आयातीत २१ टक्के घट नोंदवली गेली आहे. एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) च्या मते, या कालावधीत एकूण ४६.४७ लाख टन तेलाची आयात झाली होती, तर मागील काळात हा आकडा ५८.८७ लाख टन होता. फेब्रुवारी महिन्यातही या तेलांची आयात १३ टक्क्यांनी घटून ९.७४ लाख टनांवर आली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हा आकडा ११.१४ लाख टन होता.

चालू वर्षात एकूण तेल आयातीत २१ टक्के घट झाल्याने रिफाइंड तेलाचा वाटा वाढला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर-फेब्रुवारी या कालावधीत एकूण तेल आयातीत रिफाईंड तेलाचा वाटा १४ टक्के होता. चालू तेल वर्षाच्या याच कालावधीत हा वाटा १७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. 

चालू वर्षात एकूण तेलाच्या आयातीत २१ टक्क्यांनी घट झाल्याच्या तुलनेत रिफाइंड तेलाच्या आयातीत केवळ ३ टक्के घट झाली आहे. यावर्षी फेब्रुवारीपर्यंत ७.९२ लाख टन शुद्ध तेलाची आयात करण्यात आली आहे. गेल्या तेल वर्षाच्या याच कालावधीत हा आकडा ८.१९ लाख टन होता.

गेल्या वर्षात फेब्रुवारीपर्यंत एकूण आयात तेलात कच्च्या तेलाचा वाटा ८६ टक्के होता. चालू तेल वर्षाच्या याच कालावधीत हा हिस्सा ८३ टक्क्यांवर आला आहे. तर चालू वर्षात फेब्रुवारीपर्यंत ३८.३२ लाख टन कच्च्या तेलाची आयात करण्यात आली आहे, जी मागील याच कालावधीत आयात केलेल्या ५०.२५ लाख टनांच्या तुलनेत सुमारे २४ टक्के कमी आहे.

चालू वर्षी कच्च्या सोयाबीन तेलाच्या आयातीत  मोठी घट होऊन ही आयात जवळपास निम्म्यावर आली आहे. नोव्हेंबर-फेब्रुवारी या कालावधीत ६.६४ लाख टन सोयाबीन तेलाची आयात करण्यात आली आहे, जी गेल्या तेल वर्षाच्या याच कालावधीत आयात केलेल्या १२.०४ लाख टन सोयाबीन तेलाच्या तुलनेत सुमारे ४५ टक्के कमी आहे. 

कच्च्या सूर्यफूल तेलाची आयातही कमी झाली आहे. चालू वर्षात फेब्रुवारीपर्यंत ९.०६ लाख टन सूर्यफूल तेलाची आयात करण्यात आली आहे, जी मागील याच कालावधीत आयात केलेल्या ९.६९ लाख टनांच्या तुलनेत ६.५ टक्के कमी आहे.

Web Title: decline in edible oil imports this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.