श्रावण सुरू झाला की, उपवासासाठी केळीची मागणी अधिक असते. बाजारात मोठ्या प्रमाणात केळी विक्रीसाठी येतात. मात्र, बऱ्याच ठिकाणी केळीला अधिक मागणी असल्याने पावडर लावून केळीची विक्री होत असल्याचे दिसते. अशी पावडर लावलेली केळी आरोग्यासाठी घातक असतात.
उपवासामुळे मागणी वाढली
श्रावण सुरु झाला की, अनेकांचे उपवास सुरु असतात. श्रावणी सोमवार, शनिवार, मंगळवार, गुरुवार, संकष्टी, गोकुळाष्टमी अशा उपवासांसाठी केळीची मागणी वाढते.
५० रुपये डझन उपवासासाठी प्राधान्याने केळीला महत्त्व दिले जाते. उपवास काळात केळीला जास्त मागणी असल्याने सध्या किरकोळ बाजारात पन्नास रुपये डझनने केळी विक्री होत आहे.
पावडर टाकून पिकविलेली केळी कशी ओळखाल?
नैसर्गिकरीत्या पिकलेल्या केळीचा देठ काळा असतो तर कृत्रिमरीत्या पिकविलेल्या केळीचा देठ हा हिरवा किंवा पिवळा असतो.
• नैसर्गिकरीत्या पिकलेल्या केळीवर काळे छोटे- छोटे ठिपके असतात आणि ती चवीलाही गोड असतात.
महिनाभरात एकही कारवाई केलेली नाही
• श्रावण महिना संपून गणपती उत्सव जवळ आला तरी अन्न व औषध प्रशासनाने अशा पावडर लावलेल्या केळी विक्रेत्यावर मुंबई परिसरात कारवाई केलेली नाही.
पूर्ण पिकलेली केळी नसल्यास गळा दुखू शकतो
■ मागणी वाढल्याने कच्ची केळी पावडर लावून विक्रीसाठी बाजारात आणली जातात.
■ अशी कच्ची केळी खाल्ल्याने घसा खवखवण्याचा त्रास होतो.
■ बाजारात पावडर लावून विक्री होत असलेली केळी आढळल्यास आपण अन्न प्रशासनाच्या हेल्पलाइनवर किंवा कार्यालयात तक्रार करु शकता, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे म्हणणे आहे.