सुनील चरपे
नागपूर आंबट गोड चव आणि सिट्रस ॲसिडमुळे बांगलादेशात नागपुरी संत्र्याची प्रचंड मागणी आहे. बांगलादेश सरकारने संत्र्यावर प्रतिकिलो ८८ रुपये आयात शुल्क लावल्याने संत्र्याचे दर अडीच पटीने वाढले आहेत. वाढीव दर बांगलादेशी नागरिकांना परवडणारा नसल्याने तिथे संत्र्याची विक्री फारच संथ असल्याची माहिती संत्रा निर्यातदारांनी दिली. याचा फटका विदर्भातील संत्रा उत्पादकांना बसला केंद्र सरकार काहीही उपाययोजना करायला तयार नाही.
मागच्याच महिन्यात केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क लावल्याने देशातील कांदा बाजारभाव पडले आणि शेतकरी अडचणीत आले होते. या निर्णयानंतर बांगला देशात निर्यात होऊ घातलेल्या कांद्याला ब्रेक बसला आणि बांगलादेशही कांदा कोंडीमुळे अडचणीत आला होता. आता या देशाने पूर्वीच लागू असलेल्या आयात शुल्कात वाढ करून संत्र्याची कोंडी केली असून कांद्यानंतर नागपुरी संत्रा बागायदार अडचणीत आले आहेत.
बांगलादेशात संत्रा कंटेनरऐवजी प्लास्टिक क्रेटमध्ये भरून ट्रकद्वारे पाठविला जातो. सध्या बांगलादेशात २० किलो संत्रा असलेली क्रेट सरासरी ३,६०० रुपयांना विकली जात असल्याने ग्राहकांना हा संत्रा १८० रुपये किलो म्हणजेच २३७ टका (बांगलादेशी चलन) ला खरेदी करावे लागत आहे.
बांगलादेशातील सामान्य ग्राहकांची ऐपत ८० ते ११० टका प्रतिकिलो संत्रा खरेदी करण्याची आहे. २३७ टका प्रतिकिलो दराने संत्रा खरेदी करणे त्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने इच्छा असूनही ते संत्रा खरेदी करीत नाही. त्यामुळे मागणी असूनही विक्री संथ आहे, अशी माहिती संत्रा निर्यातदार जावेदभाई यांनी दिली असून, याला इतर निर्यातदारांनी दुजोरा दिला आहे.
केंद्र सरकारने संत्रा निर्यातीला १०० टक्के म्हणजेच प्रतिकिलो ८८ रुपये सबसिडी दिल्यास हा दर ९२ रुपये म्हणजेच १२१ टका प्रतिकिलो दर होतील. हा दर तेथील सामान्यांना परवडणारा आहे. उत्पादकांना आर्थिक फायदा बांगलादेशात नागपुरी संत्र्याची होईल, असेही निर्यातदारांनी विक्री वाढल्यास विदर्भातील संत्र्याचे दर प्रतिटन किमान १० सोडविण्यासाठी केंद्र सरकारने हजार रुपयांनी वाढतील. यात संत्रा ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.
संत्र्यावर एक पैसाही खर्च केला नाही. आज संत्रा उत्पादक संकटात असताना केंद्र सरकार काही करायला तयार नाही. ही समस्या • सोडविण्यासाठी संत्रा उत्पादकांनी मतभेद विसरून एकत्र येणे व शांततेने आंदोलन करणे आवश्यक आहे.- कार्यकारी संचालक, महाऑरेंज.
राजकीय नेते विरोधात असताना त्यांना संत्रा आठवतो आणि सत्तेत येतात सर्व नेते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. सरकारने अलीकडच्या काळात दोन संत्रा प्रक्रिया प्रकल्पांचे भूमिपूजन केले तर एका प्रकल्पाची घोषणा केली. हे प्रकल्प गेले कुठे?
- श्रीधर ठाकरे, नीलेश रोडे, संत्रा उत्पादक व व्यावसायिक.
वाहतूक खर्च २.७५ लाख तर आयात शुक्ल २२ लाख रुपये
विदर्भातून बांगलादेशात संत्रा न्यायचा झाल्यास २५ टन संत्र्याला किमान २ लाख ४५ हजार रुपये वाहतूक खर्च येतो. बांगलादेशच्या सीमेपर्यंतचा वाहतूक खर्च १ लाख ७५ हजार रुपये असून, सीमेवर हा संत्रा बांगलादेशच्या ट्रकमध्ये लोड करून तो तेथील बाजारपेठेत पोहोचविला जातो. सीमेपासून बाजारपेठेत जाण्याचे भाडे सरासरी ७० हजार रुपये द्यावे लागते. प्रतिकिलो ८८ रुपयांप्रमाणे २५ टन संत्र्यासाठी २२ लाख रुपये आयात शुल्क द्यावा लागतो, असेही निर्यातदार जावेदभाई यांनी सांगितले.