Lokmat Agro >बाजारहाट > गेली ६ महिने वाट पाहूनही सोयाबीनची दरकोंडी कायम दुसरीकडे हळदीच्या दरात ही घसरण सुरूच

गेली ६ महिने वाट पाहूनही सोयाबीनची दरकोंडी कायम दुसरीकडे हळदीच्या दरात ही घसरण सुरूच

Despite waiting for the last 6 months, the price of soybeans is still in pressure, on the other hand, the price of turmeric continues to fall | गेली ६ महिने वाट पाहूनही सोयाबीनची दरकोंडी कायम दुसरीकडे हळदीच्या दरात ही घसरण सुरूच

गेली ६ महिने वाट पाहूनही सोयाबीनची दरकोंडी कायम दुसरीकडे हळदीच्या दरात ही घसरण सुरूच

शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा लागून ..

शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा लागून ..

शेअर :

Join us
Join usNext

सोयाबीनची दरवाढ होईल, या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी सहा ते सात महिने प्रतीक्षा केली. परंतु, अजूनही दरकोंडी कायम असून, आता हळदीच्या भावातही घसरण झाली आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात यंदा सोयाबीनने पाच हजाराचा पल्लाही गाठला नाही. सध्या जास्तीत जास्त साडेचार हजारांपर्यंत सोयाबीन विक्री होत आहे. हा भाव कवडीमोल असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी भाव वाढतील, या आशेवर सोयाबीन विक्रीविना ठेवले.

मात्र, सहा ते सात महिने उलटूनही भाव वाढले नाही. त्यामुळे आता मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री करावी लागत आहे. तर एप्रिल आणि मेमध्ये सरासरी १६ हजार रुपये भाव मिळालेली हळद २४ जून रोजी १३ ते १५ हजार रुपये क्विंटलने विक्री झाली.

भाववाढीच्या प्रतीक्षेत जवळपास निम्मे शेतकऱ्यांनी हळद विक्रीविना ठेवली आहे. परंतु, भाव वाढण्याऐवजी घसरत असल्याने फटका बसत आहे. येणाऱ्या दिवसांत हळदीची दरवाढ होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

हरभऱ्याची आवक मंदावली

■ मोंढ्यात मागील आठवड्यापर्यंत ३०० ते ४०० क्विंटल हरभरा विक्रीसाठी येत होता.

■ आता मात्र शेतकरी पेरणीच्या कामात गुंतल्याने हरभऱ्याची आवक मंदावली आहे.

■ २४ जून रोजी १०० क्विंटल हरभरा विक्रीसाठी आला होता. ६ हजार ५० ते ६ हजार ४०० रुपयांदरम्यान भाव मिळाला.

■ आवक मंदावल्याने दरात क्विंटलमागे शंभर ते दोनशे रुपयांची वाढ झाली आहे.

उन्हाळी मुगाला मिळाला सात हजारांचा भाव

■ जिल्ह्यातील काही भागातील शेतकरी उन्हाळी मुगाचे पीक घेऊ लागले आहे.

■ सोमवारी मोंढ्यात ८ क्विटल मूग विक्रीसाठी आला होता. या मुगाला ६ हजार ९०० ते ७ हजार १०० रुपयांदरम्यान भाव मिळाला. तर काही शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनही विक्रीसाठी आणले होते. हे सोयाबीन मात्र खरिपातील सोयाबीनच्या भावातच विक्री होत आहे.

मोंढ्यात विक्रीसाठी आलेला शेतमाल

शेतमालआवक (क्विं. मध्ये)सरासरी भाव
गहू१६०२,४२५
ज्वारी५०१७५०
मूग०८७०००
सोयाबीन८००४३२५
हरभरा१००६२२५
हळद१८००१४१००

हेही वाचा - White Jamun Success Story बुटक्या जातीचे सफेद जांभूळ शेतकऱ्यांसाठी वरदान

Web Title: Despite waiting for the last 6 months, the price of soybeans is still in pressure, on the other hand, the price of turmeric continues to fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.