Join us

नववर्ष पाडव्यालाच हळद उत्पादकांत नाराजी; काय मिळाला हळदीला दर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 12:11 PM

पाडव्याच्या मुहूर्तावर मंगळवारी हळदीच्या ७ हजार कट्ट्यांची आवक

वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती मोंढ्यात पाडव्याच्या मुहूर्तावर मंगळवारी हळदीच्या ७ हजार कट्ट्यांची आवक झाली. बिटात दर्जेदार हळद कांडीस प्रति क्विंटल १९ हजार रुपयांचा दर मिळाला. कमीत कमी १४ हजारांपर्यंत हळद गेली होती. एरंडी, हरभरा, सोयाबीनचेही बिट यावेळी झाले.

अनेक शेतकरी पाडव्याच्या मुहूर्तावर हळद विक्री करिता घेऊन आले होते. ज्यांना चांगला आणि उच्च दर मिळण्याची अपेक्षा होती. मात्र सरासरी दर मिळाल्याने अनेक शेतकरी नारजीत परत गेले.

हेही वाचा - शेतकऱ्यांनो लेकीच्या नावाने पोस्टाच्या या योजनेत खाते उघडा होईल मोठा फायदा

आठवडाभरापासून हळदीचे दर कमी-जास्त होत आहेत. यापूर्वी २१ हजार रुपयांपर्यंत हळद गेली होती. पाडव्याच्या

मुहूर्तावर मंगळवारी बिटात दर्जेदार हळद कांडीस प्रति क्विंटल १९ हजार रुपये दर मिळाला. कमीत कमी १४ हजारापर्यंत हळद गेली.

मोंढ्यात हळदीच्या दरात तेजी-मंदी येत आहे. पाडव्याला हळदीला उच्चांकी दर मिळेल असे वाटले होते. परंतु १९ हजारांपुढे हळद गेली नाही. बिटामध्ये एरंडी ४६००, सोयाबीन ४५३५, हरभरा ५७४० रुपयांपर्यंत गेला.

राज्यात किती झाली हळदीची आवक व काय मिळाला दर 

शेतमाल : हळद/ हळकुंड

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/04/2024
जिंतूरनं. १क्विंटल150133001510014500
पुर्णाराजापुरीक्विंटल53138001481014500
टॅग्स :बाजारशेतकरीहिंगोलीशेती