Pune : दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहात सगळीकडे साजरा केला जात आहे. शहरातील मंडळी आपापल्या गावी गेली असून कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पाठवलेल्या मालाला शेतकऱ्यांना कमी दर मिळताना दिसत आहे. दिवाळीमध्ये फळांना मागणीही कमी झाल्याची माहिती बाजार समित्यांतील व्यापाऱ्यांनी सांगितली आहे.
दरम्यान, दिवाळीनिमित्त मागील एका आठवड्यापासून नागरिक गावी जात आहेत. त्यामुळे शहरात फळांची मागणी घटली आहे. पण शेतकऱ्यांकडून येणाऱ्या मालाच्या आवकेमध्ये कमी झाली नसल्याने दर उतरले आहेत. दिवाळीच्या एका आठवड्यामध्ये हे दर असेच राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
पावसामुळे माल खराबदोन आठवड्यापूर्वी राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे फळपिके, भाजीपाला पिके आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये द्राक्षे, मका, सोयाबीन, अंजीर, सिताफळ, डाळिंब, झेंडू अशा पिकांचा सामावेश आहे. पावसामुळे झेंडूवर काळे डाग पडले असून खराब मालामुळे ग्राहकांना कमी दरामध्ये विक्री करावी लागत आहे.
दिवाळीचा पूर्ण आठवडा दर कमीचदिवाळी सणामुळे सर्वजण वेगळ्या उत्साहात असतात. अनेकजण गावाला गेलेले आहेत. तर दिवाळीतील फराळामुळे फळे खरेदीकडे ग्राहक पाठ फिरवतात. तर दिवाळीचा पूर्ण आठवडा दैनंदिन जीवन सुरू होत नाही तोवर शेतकऱ्यांच्या मालाला कमीच दर राहतील अशी शंका व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.