गाढव हा तसा दुर्लक्षित प्राणी, एखाद्याला हिणवण्यासाठी गाढव आहेस काय? असा टोमणा मारला जातो. परंतू याच गाढवांनी माळेगाव यात्रेत चांगलाच भाव खाल्ला आहे. दहा हजार रुपयांपासून ते एक लाख रुपये किंमतीचे गाढव यात्रेतील बाजारात आले आहेत. विशेष म्हणजे यावर्षी गाढव खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे मात्र पुढच्या वर्षी यात्रेतच देण्यात येतात. याच पद्धतीने केवळ विश्वासावर गाढवांच्या खरेदी विक्रीचा हा व्यवहार चालतो.
माळेगाव यात्रेत श्वानांपासून ते उंटापर्यंत सर्व प्रकारचे प्राणी विक्रीसाठी येतात. अनेक राज्यातून माळेगाव यात्रेत हे प्राणी खरेदी करण्यासाठी अनेक नागरिकही दाखल होतात. विशेष म्हणजे या यात्रेत दरवर्षी गाढवांचा बाजार भरतो. या गाढवांची खरेदी-विक्रीही केली जाते. त्यासाठी उच्च जातीचे गाढव कोणते? हे ओळखणारेही या ठिकाणी येतात. यंदा यात्रेत गाढवांनी चांगलाच भाव खाल्ल्याचे दिसून येत आहे.
कोणत्या राज्यातून आले गाढवं विक्रीस?
या गाढवाच्या बाजारात दहा हजारा पासून ते एक लाख रुपया पर्यंतचे गाढव विक्रीला आले आहेत. गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यातून गाढव विक्रीसाठी दाखल झाले आहेत. गाढव खरेदी विक्रीचा व्यवहार हा उधारी वर चालतो. या वर्षी खरेदी केलेल गाढव त्याचे पैसे पुढच्या वर्षी याच यात्रेत देतात. हा सर्व व्यवहार केवळ विश्वासावर चालतो.
हेही वाचा-