Join us

दुबार व्यापार विक्री बंद! शेतकऱ्यांना तब्बल पन्नास टक्के जास्तीचा भाव

By दत्ता लवांडे | Published: October 09, 2023 5:51 PM

मालाला भाव मिळाल्यावर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

पुण्यातील मांजरी उप बाजार समिती येथील संचालक मंडळांनी खोती आणि दुबार व्यापारी विक्री बंद केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री केली जात आहे. 

हवेली परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर पिकवलेला भाजीपाला मांजरी उप बाजार समिती येथे विक्रीसाठी आणत असतात. तर तेथील खोती (शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन थेट माल विकत घेणारे) आणि व्यापाऱ्यांकडून या शेतकऱ्यांचा माल कमी भावात विकत घेऊन ग्राहकांना चढ्या भावाने विक्री होत असतो. दरम्यान, या बाजार समितीतील संचालक मंडळाने खोती आणि दुबार व्यापारी विक्री बंद केल्यामुळे आता शेतकऱ्यांना फायदा होत आहे. 

संचालक मंडळाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तब्बल पन्नास टक्के जास्तीचा भाव भाजीपाल्याला मिळत आहे. तर  या निर्णयानंतर खोती आणि व्यापारी बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर भाजीपाल्याची विक्री करत आहेत. 

विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी माल आणल्यानंतर या उपबाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना कुठलीही आडत, तोलाई किंवा कमिशन आकारले जात नाही. त्यामुळे ग्राहकांकडून मालाला मिळणारा भाव थेट शेतकऱ्यांना मिळत असल्याची माहिती बाजार समितीच्या संचालक मंडळातील सुदर्शन चौधरी यांनी सांगितली.

मांजरी उपबाजार समितीमध्ये कालचे भाजीपाल्याचे भाव भाज्यांची नावे - दर (रुपयांमध्ये)आंबट चुका - ६/ नगकारली - ३५/किलो दुधी भोपळा - २०/किलोवांगी - ७/किलो कोबी - ७/किलोढोबळी मिरची -५०/किलो गाजर -२५/किलो चवळी -५०/किलो कोथिंबीर -१५ /नग, जुडीकाकडी -२०/किलोघेवडा -५०/किलो घोसाळी -३०/किलो हिरवी मिरची - ४०/किलो भेंडी -५५/किलोमेथी -२५/नग, जुडीपालक - १८/नग, जुडीपावटा - ६०/किलोटोमॅटो - ९/किलो

टॅग्स :शेतकरीभाज्याकृषी उत्पन्न बाजार समिती, कळमनापुणे