नांदेड : हिवाळा सुरु होताच प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेतो. व्यायामासोबतच योग्य आहार घेण्यास प्राधान्य दिले जाते. सध्या मेथीचे लाडू, डिंकाचे लाडूला मागणी वाढली असून त्याचे भावही वाढले आहेत.
इराण, इराकमधून आला सुकामेवा
वस्तू | दर |
काजू | १००० |
बदाम | १००० |
मनुके | ३०० |
डिंक | ८०० |
ऐन हिवाळ्यात मेथी गरम !
हिवाळ्यात मेथीची जुडीला अधिक मागणी असते. त्यामुळे सध्या मेथीची एक जुडी ३० रूपयांला मिळत आहे.
गुळाचेही वाढले भाव
गुळ गुणकारी असल्यामुळे थंडीच्या दिवसात गुळाला अधिक मागणी असते. गुळाचे लाडू खाण्यामुळे अनेक फायदे आहेत. सध्या गुळ ५० रूपये किलो आहे.
ड्रायफ्रूट्स किंमती कशाने वाढल्या?
हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेकजण ड्रायफूटसचे सेवन करतात. घरातील लहान मुलं असेल किंवा वयोवृद्ध असतील, त्यासाठी ड्रायफ्रूटस खाण्याचा सल्ला दिला जातो. काजू आणि बादाम रात्री भिजवायला ठेवून त्याचे सकाळी सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात, त्यामुळे सकाळी अक्रोड, बदाम किवा इतर पदार्थाचे मिश्रण करून ड्रायफ्रूट खाऊ शकता, रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाल्याने शरीराला लोह मिळते, मनुके रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात, पचनची समस्या दूर होते.
सुकामेव्याला मागणी वाढली
सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने सुकामेव्याला अधिक मागणी आहे, सकाळी व्यायामासोबतच ड्रायफ्रुटचे सेवन करण्यासाठी सध्या अंजीर, बादाम, मनुके, अक्रोड, यांची मागणी अधिक आहे. नांदेडला वजिराबाद, जुनामोंढा, शिवाजीनगर, श्रीनगर, कॅनॉलरोड आदी भागात सुकामेव्याची दुकाने थाटण्यात आले आहेत. - प्रशांत डुब्बेवार, व्यापारी.