Lokmat Agro >बाजारहाट > कोरडा लसूण ४५० ते ५०० रु. किलो! लसणाच्या किमती वाढण्याची कारणं काय?

कोरडा लसूण ४५० ते ५०० रु. किलो! लसणाच्या किमती वाढण्याची कारणं काय?

Dry garlic 450 to 500 Rs. Kilo! What are the reasons for the increase in garlic prices? | कोरडा लसूण ४५० ते ५०० रु. किलो! लसणाच्या किमती वाढण्याची कारणं काय?

कोरडा लसूण ४५० ते ५०० रु. किलो! लसणाच्या किमती वाढण्याची कारणं काय?

लसूण म्हणतोय 'अब की बार ४०० पार', विक्रेते म्हणतात, लसूण घ्यायचा तर घ्या...

लसूण म्हणतोय 'अब की बार ४०० पार', विक्रेते म्हणतात, लसूण घ्यायचा तर घ्या...

शेअर :

Join us
Join usNext

जेवणात लसणाच्या पेस्टशिवाय कोणत्याच भाजीचा विचार होऊ शकत नाही.... पण, आता कारण लसणाच्या किमतीत विक्रमी वाढ झाल्याचे दिसत आहे. ओला लसूण १८० ते २०० रु. किलो, तर कोरडा लसूण ४५० ते ५०० रु. किलोने भाव वाढला आहे.

कांद्याप्रमाणेच लसणाची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांत केली जाते. खरीप लसणाची जून- जुलैमध्ये लागवड करून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कापणी केली जाते, तर रब्बी पिकासाठीची लागवड सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये केली जाते आणि -मार्च-एप्रिलमध्ये त्याची कापणी केली जाते. पण, मागच्या वर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये अनेक ठिकाणी • अवकाळी पाऊस झाल्याने पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.

लसणाच्या दरातील वाढ 

नोव्हेंबर २०२३ - २२० ते २५० 
डिसेंबर २०२३ - २५० ते ३००
जानेवारी २०२४ - ३५० ते ४००
फेब्रुवारी २०२४ - ४०० ते ४५० 
(सध्या ४०० रुपये किलो दरावर स्थिर)

भाववाढीची कारणे काय ?

• मागच्या वर्षी लसणाचे लागवड क्षेत्र कमी असल्याने तुलनेने यावर्षी लसणाची आवक कमी प्रमाणात झाली. त्यामुळे बाजारात लसणाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

• लसणाला सातत्याने मिळणारा कमी बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांचा लसूण लागवडीचा ओघ कमी झाला त्यामुळे बाजारात येणारा माल देखील कमी झाल्याचे काहींनी सांगितले.

• स्थानिक व्यापाऱ्यांनी लसूण साठवणूक केल्यामुळे लसणात भाववाढ झाली. येत्वा पंधरा ते वीस दिवसांमध्ये नवीन लसूण मार्केटमध्ये येण्यास सुरुवात होईल. त्यानंतर लसणाचे दर कमी होतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. लसणाचे भाव सातत्याने कमी जास्त होत आहेत त्यामुळे नेमका कधी आणि कोणत्या भावात लसूण खरेदी करावा, याबाबतीत ग्राहकांमध्ये संभ्रम वाढत आहे.

भाववाढीमुळे खिशाला कात्री

रोजच्या स्वयंपाकात लसूण हा लागतोच त्यामुळे परवडत नसला तरी लसूण घ्यावा लागतोच. त्यामुळे रोजच्या वापरात फरक पडला आहे. १०० रु, पाव भाव असलेला कोरडा लसूण घेण्यापेक्षा ५० रु. पाव भावाने ओला लसूण घेणे त्या तुलनेने परवडते. - कांचन राऊत, गृहिणी

भाव वाढल्यामुळे लसूण खरेदी केला नाही. घरात जो साठवून ठेवलेला होता तोच पुरवून वापरतेय, बाजारात गेल्यावर विक्रेते म्हणतात इतर कोणत्याही वस्तूत दर कमी होतील. पण, लसणामध्ये घासाधिस करू नका. - पुष्पा येवला, गृहिणी

दर वाढल्यामुळे ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. दररोज २ ते ३ किलो इतकाच लसूण विकला जातोय, ग्राहक दर ऐकून विचार करायला लागतात आणि दर कमी करा म्हणून मागे लागतात. अवकाळी झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्यामुळे भाव वाढले. 
- भास्कर ढवण, लसूण विक्रेते

बाजारसमितीत काय मिळतोय भाव?

अहमदनगर

15167

अकोला

20000

अमरावती

20000

चंद्रपुर

25000

नागपूर

15000

नागपूर

19500

नाशिक

16500

पुणे

23000

सांगली

15000

सोलापूर

19000

 

Web Title: Dry garlic 450 to 500 Rs. Kilo! What are the reasons for the increase in garlic prices?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार