Lokmat Agro >बाजारहाट > सोयाबीनचे दर घसरल्याने बाजार समितीत आवक घटली, शेतकऱ्यांची साठवणूकीला पसंती

सोयाबीनचे दर घसरल्याने बाजार समितीत आवक घटली, शेतकऱ्यांची साठवणूकीला पसंती

Due to falling prices of soybeans, inflows to the market committee decreased, farmers preferred storage | सोयाबीनचे दर घसरल्याने बाजार समितीत आवक घटली, शेतकऱ्यांची साठवणूकीला पसंती

सोयाबीनचे दर घसरल्याने बाजार समितीत आवक घटली, शेतकऱ्यांची साठवणूकीला पसंती

जळकोट समिती : शासनाचा हमीभावही मिळत नसल्याची ओरड

जळकोट समिती : शासनाचा हमीभावही मिळत नसल्याची ओरड

शेअर :

Join us
Join usNext

जळकोट येथील बाजार समितीत सोयाबीनचे दर घसरले असल्याने आवक घटली आहे. परिणामी, समिती परिसरात शुकशुकाट दिसत आहे. दर वाढतील तेव्हाच मोठ्या प्रमाणात आवक होईल, असे चित्र आहे.

जळकोट तालुक्यात शेतकरी खरीप हंगामात सोयाबीनची सर्वाधिक पेरणी करतात. दोन वर्षांपूर्वी दर दहा हजारांवर पोहोचले होते. त्यामुळे पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र, यंदा बाजारात सोयाबीनला ४४०० ते ४५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. शासनाने जाहीर केलेला हमीभावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट

उभे ठाकले आहे. आगामी काळात दर वाढतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरीच सोयाबीनची साठवणूक करण्यास पसंती दर्शविली आहे. दरम्यान, सध्या बाजारात हरभऱ्याला ५,८०० ते ६ हजार रुपयांपर्यंत दर मिळत असून, दररोज

कमी पर्जन्यमानाचा पिकांना फटका

■ या वर्षी तालुक्यात अतिशय कमी पर्जन्यमान झाल्यामुळे पाहिजे तेवढे उत्पादन झाले नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांनी नगदी पीक समजून सोयाबीन, कापूस ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली होती. त्याखालोखाल ज्वारी, तूर ही पिके घेतली. मात्र, पावसाने उघडीप दिल्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आणि बळीराजा संकटात सापडला आहे. सध्या बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक घटली आहे. चांगला दर मिळेल तेव्हाच शेतकरी बाजारात माल विक्रीसाठी घेऊन येतील, असे जळकोट बाजार समितीचे सभापती विठ्ठल चव्हाण, सचिव बालाजी उगले यांनी सांगितले.

५० क्विंटलची आवक होत आहे. हायब्रीड ज्वारीचा भाव २२०० ते २६००, बडी ज्वारी ३२०० ते ३५००, तर तुरीचे भाव १० हजार १०० रुपयांवर पोहोचले आहेत. बाजार समितीत ५० अडत दुकाने असून, ४० मुनीम आणि शंभर ते दीडशे हमाल-मापाडी आहेत. सध्या बाजार समितीत आवकच नसल्याने त्यांना रिकामे बसावे लागत आहे. आगामी काळात दर वाढले तरच बाजारात आवक होण्याची शक्यता आहे.

Web Title: Due to falling prices of soybeans, inflows to the market committee decreased, farmers preferred storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.