Join us

रखरखत्या उन्हामुळे आठवडी बाजारामध्ये शुकशुकाट !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 11:10 AM

सोमवारी दिवसभर कडाक्याचे ऊन राहिल्याने या रखरखत्या उन्हाचा अहमदपूरच्या बाजारावर चांगलाच परिणाम दिसत होता.

एप्रिल महिना संपत आला तसा उन्हाचा पारा वाढत चालला आहे. सोमवारी दिवसभर कडाक्याचे ऊन राहिल्याने अहमदपुरातील आठवडी बाजाराला चांगलीच मरगळ आली होती. या रखरखत्या उन्हामुळे बाजारसाठी बाहेर पडणे कठीण झाल्याने व्यापाऱ्यांना ऊन उतरण्याची वाट पाहावी लागली.

अहमदपूर येथे सोमवारी आठवडी बाजार भरतो. या बाजाराला पंचक्रोशील गावागावातून मोठ्या संख्येने बाजाराला नागरिक येतात. सोमवारी दिवसभर कडाक्याचे ऊन राहिल्याने या रखरखत्या उन्हाचा अहमदपूरच्या बाजारावर चांगलाच परिणाम दिसत होता. उन्हामुळे ग्राहक बाजारात फिरकत तर नाहीतच पण विक्रेतेही उन्हाच्या तडाख्यामुळे हैराण आहेत. कापडाच्या तात्पुरत्या पालाचा आधार घेतात.

उन्हाचा बाजाराला तडाखा बसला आहे. ग्राहक येत नाहीत. विक्रीसाठी आणलेला मालही लवकर खराब होतो.त्यामुळे विक्रेत्यांचे नुकसान होत असल्याचे भाजीपाला विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. भाजीपाला व्यापाऱ्यांनी सकाळी दहा वाजेपासूनच आपल्या दुकानाची पाले थाटून ठेवली होती. मात्र, रखरखत्या उन्हामध्ये ग्राहकांनी बाजाराला येणे टाळल्याने भाजीपाला व्यापाऱ्यांना ऊन उतरण्याची वाट पाहण्या खेरीज काहीच पर्याय उरला नव्हता. दुपारी चारनंतर ग्राहक बाजारात फिरकताना दिसू लागले. मात्र, व्यापाऱ्यांना उन्हाचा चांगलाच फटका बसला आहे. शहरात सकाळी अकरा वाजेपासूनच उन्हाचे चटके बसू लागल्याने सोमवारी भरणाऱ्या आठवडे बाजारावर देखील मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. मुख्य रस्त्यांवर उन्हामुळे वर्दळ कमी होती. जनसामान्य जीवनावर तापमानाचा परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे.

दुपारी चारपर्यंत शुकशुकाट

 शहरात आठवडी बाजार दर सोमवारी भरत असून दिवसेंदिवस उन्हामुळे गर्दीचे प्रमाण कमी होत चालले आहे. उन्हाची तीव्रता वाढत चालली असून आठवडी बाजारात दुपारी चारपर्यंत बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला. १२४ गाववाड्या-तांड्यांनी जोडलेला मोठा तालुका आहे. अनेक खेड्यांचा संपर्क असल्याने आठवडी बाजार हा खूप मोठा भरतो. परंतु, उन्हाची तीव्रता जास्त जाणवत असल्याने आठवडी बाजारात दुपारी चारपर्यंत बाजारात शुकशुकाट दिसून येत आहे.

भाजीपाला विक्रेत्यांनाही फटका

उन्हामुळे ग्राहक बाजारात फिरकत तर नाहीतच पण विक्रेतेही उन्हाच्या तडाख्यामुळे हैराण आहेत. कापडाच्या तात्पुरत्या पालाचा आधार घेतात. उन्हाचा बाजाराला तडाखा बसला आहे. ग्राहक येत नाहीत.

ऊन जास्त असल्यामुळे ग्राहकांवर परिणाम झाला आहे. आम्हाला सकाळी दहानंतर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. विक्रीसाठी आणलेला मालही लवकर खराब होतो. त्यामुळे विक्रेत्यांचे नुकसान होत असल्याचे भाजीपाला विक्रेत्यांनी सांगितले.

आठवडाभरापासून तापमान वाढ

सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत नागरिक आपली कामे आटोपण्याच्या प्रयत्न करीत आहेत. एवढा परिणाम तापमानाचा झाला आहे. साधारणतः २० एप्रिलपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे.

गेल्या ८ ते १० दिवसांपासून तालुक्यातील तापमानाने उच्चांक गाठला आहे. २९ एप्रिल रोजी अहमदपूर तालुक्याचे तापमान ४१ पर्यंत पोहोचले होते. सोमवारी आठवडी बाजार असताना देखील मेनरोड, मुख्य बाजारपेठ, शासकीय कार्यालय भागात तुरळक वर्दळ होती.

 

टॅग्स :मार्केट यार्डतापमान