Join us

कांद्याच्या बाजारभाव वाढीने शेतकऱ्यांचा दसरा हसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2023 10:41 AM

कांद्याने दसऱ्याच्या पूर्वसंध्येला दरवाढीचे सीमोल्लंघन केले. सोमवारी ४,३२८ प्रतिक्विंटल असे सर्वोच्च लिलाव येथील बाजार समितीत पुकारले गेले.

जिजाबराव वाघगेल्या काही महिन्यांपासून कोसळलेल्या कांद्याने दसऱ्याच्या पूर्वसंध्येला दरवाढीचे सीमोल्लंघन केले. सोमवारी ४,३२८ प्रतिक्विंटल असे सर्वोच्च लिलाव येथील बाजार समितीत पुकारले गेले. यामुळे शेतकऱ्यांचा दसरा हसरा झाला.

यंदा दुष्काळ, विषम हवामानामुळे कांदा उत्पादनावर परिणाम झाला. मध्यंतरी नाशिक जिल्ह्यात लिलावही थांबले होते. परिणामी भाव घसरले होते. लासलगाव बाजारातही कांद्याचे दर एकाच आठवड्यात ३७ टक्क्यांनी वाढले व भाव २३ रुपयांवरून ३२ रुपयांवर पोहोचला आहे. किरकोळ बाजारात कांदा भाव खात आहे.

शुभारंभालाच लाल कांद्याला ११ हजारनाशिक देवळा येथील खारी फाटा बाजार मार्केटमध्ये नवीन लाल कांदा लिलावात मुहूर्ताच्या कांद्याला सर्वोच्च १९, १११ रुपये, तर उमराणे बाजार समितीत ९,१११ रुपये भाव मिळाला आहे.

टॅग्स :कांदाबाजारनाशिकपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्ड