Join us

Soybean Rates : हंगाम संपला तरी सोयाबीनला हमीभाव मिळेना! आज किती मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 9:01 PM

यंदाच्या रब्बी हंगामाची सांगता झाली असून उन्हाळी हंगामातील काही पीके शेतात उभी आहेत.

यंदाच्या रब्बी हंगामाची सांगता झाली असून उन्हाळी हंगामातील काही पीके शेतात उभी आहेत. तर अनेक शेतकऱ्यांना खरिपाची तयारी सुरू केली आहे. अख्खा हंगाम संपला तरी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभावाएवढा दर मिळताना दिसला नाही. सुरूवातीचा एक महिना सोडला तर सोयाबीनचे दर हे ३ हजार ८०० ते ४ हजार ५०० च्या दरम्यान होते. या दरात अजूनही वाढ झालेली नाही.

दरम्यान, आज हायब्रीड, लोकल, पांढरा, पिवळा या वाणाच्या सोयाबीनची आवक झाली होती. त्यामध्ये अहमदपूर, लोणार, मुर्तीजापूर, हिंगणघाट, अकोला, जालना, लातूर, मेहकर आणि कारंजा या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती. तर लातूर बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे १५ हजार ४६० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. 

आजच्या दिवसातील सरासरी उच्चांकी दर हा सोलापूर बाजार समितीत ४ हजार ६४५ रूपये प्रतिक्विंटल एवढा होता. तर सोलापूर बाजारात आज केवळ ४८ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. निच्चांकी दराचा विचार केला तर आज हिंगणघाट बाजार समितीमध्ये केवळ ३ हजार ९०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. येथे ३ हजार ८६९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. 

आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/05/2024
लासलगाव---क्विंटल218370145314500
लासलगाव - विंचूर---क्विंटल510300046004550
बार्शी---क्विंटल408448146004500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल42425045004375
माजलगाव---क्विंटल558400045524491
राहूरी -वांबोरी---क्विंटल1440044004400
पाचोरा---क्विंटल150425044374321
सिल्लोड---क्विंटल10435044004350
कारंजा---क्विंटल4000419045504450
तुळजापूर---क्विंटल62455045504550
राहता---क्विंटल4446144614461
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल206435145694525
सोलापूरलोकलक्विंटल48464046554645
नागपूरलोकलक्विंटल549410045004400
हिंगोलीलोकलक्विंटल830410045854342
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल8395144244100
मेहकरलोकलक्विंटल1200400044804300
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल191412645564521
लातूरपिवळाक्विंटल15460453046524600
जालनापिवळाक्विंटल3786400045254475
अकोलापिवळाक्विंटल3672410045604400
यवतमाळपिवळाक्विंटल569439545704482
चिखलीपिवळाक्विंटल750420045504375
हिंगणघाटपिवळाक्विंटल3869280046303900
पैठणपिवळाक्विंटल1350135013501
वर्धापिवळाक्विंटल28407542904120
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल56425044254375
जिंतूरपिवळाक्विंटल147440044554426
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1250425045604470
मलकापूरपिवळाक्विंटल288415544804360
दिग्रसपिवळाक्विंटल90434044204395
सावनेरपिवळाक्विंटल3423042304230
चांदूर बझारपिवळाक्विंटल87400044004260
देउळगाव राजापिवळाक्विंटल3445044504450
लोणारपिवळाक्विंटल1000430044914395
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल111375043004000
नांदगावपिवळाक्विंटल12440045504550
अहमहपूरपिवळाक्विंटल1577400046364561
औराद शहाजानीपिवळाक्विंटल470454246004571
मुखेडपिवळाक्विंटल12470047004700
पुर्णापिवळाक्विंटल342432045614431
पाथरीपिवळाक्विंटल2430043014300
नांदूरापिवळाक्विंटल415400044014401
नेर परसोपंतपिवळाक्विंटल431310044954280
काटोलपिवळाक्विंटल310405044504250
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल368400044504400
देवणीपिवळाक्विंटल27462046624641
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड